AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andheri Murder : माता न तू वैरिणी ! मनोरुग्ण मुलीची देखरेख जमत नसल्याने आईने केली हत्या, अंधेरीतील धक्कादायक घटना

मयत मुलगी आठ महिन्यांची असताना पडली होती. त्यामुळे तिच्या मेंदूला दुखापत झाली होती, यामुळे ती मनोरुग्ण झाली. यानंतर घरामध्ये नैराश्येचं वातावरण आहे. तेव्हापासून आता 19 वर्षाची होईपर्यंत आई तिची देखभाल करत आहे. मात्र आता आईला तिची देखभाल करणे कठिण झाले होते. यामुळे आईनेच तिची गळफास लावून हत्या केली.

Andheri Murder : माता न तू वैरिणी ! मनोरुग्ण मुलीची देखरेख जमत नसल्याने आईने केली हत्या, अंधेरीतील धक्कादायक घटना
मनोरुग्ण मुलीची देखभाल जमत नसल्याने आईने केली हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 5:46 PM
Share

मुंबई : मनोरुग्ण (Mentally Ill) मुलीची देखभाल करणे कठिण होत असल्याने आईनेच आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना अंधेरीत घडली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आईला अटक (Arrest) केली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेला पारसीवाडा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मुलीची हत्या करुन आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलील चौकशीत सर्व उघड झाले. मुलीची देखरेख करणे जमत नसल्याने आपण हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. याबाबत अधिक तपास अंधेरी पोलीस करत आहेत.

मुलगी मनोरुग्ण असल्याने देखभाल करणे कठिण झाले होते

मयत मुलगी आठ महिन्यांची असताना पडली होती. त्यामुळे तिच्या मेंदूला दुखापत झाली होती, यामुळे ती मनोरुग्ण झाली. यानंतर घरामध्ये नैराश्येचं वातावरण आहे. तेव्हापासून आता 19 वर्षाची होईपर्यंत आई तिची देखभाल करत आहे. मात्र आता आईला तिची देखभाल करणे कठिण झाले होते. यामुळे आईनेच तिची गळफास लावून हत्या केली. त्यानंतर पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आईची चौकशी केली असता आईने हत्येची चौकशी केली असता आईने आपणच हत्या केल्याचे कबुल केले. सध्या अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी महिलेला अटक केली आहे. (The mentally ill girl was killed by her mother in the andheri as she could not take care of her)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.