AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli ACB Action : सांगलीत लाच घेणे पोलिसाला भोवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीकडून अटक

एका वडाप रिक्षा चालककाकडे कारवाई न करण्यासाठी रवी चव्हाण यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी 10 जून रोजी केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जून रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चव्‍हाण यांना रंगेहाथ पकडले.

Sangli ACB Action : सांगलीत लाच घेणे पोलिसाला भोवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीकडून अटक
सांगलीत लाच घेणे पोलिसाला भोवलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 4:42 PM
Share

सांगली : एक हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षका (Assistant Sub-Inspector of Police)स लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक (Arrest) केली आहे. एका रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी या पोलिसाने एक हजार रुपयांची लाच मागितली होती. रवीशंकर रामचंद्र चव्‍हाण (53) असे या पोलिसाचे नाव आहे. मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात चव्हाण कार्यरत आहे. एक हजार रुपयाची लाच स्विकारताना चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर झालेल्या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ माजली आहे.

पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचून रंगेहाथ पकडले

एका वडाप रिक्षा चालककाकडे कारवाई न करण्यासाठी रवी चव्हाण यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी 10 जून रोजी केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जून रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चव्‍हाण यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्येच रवीशंकर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.

इंदापूरमध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

मोजणीनंतर हद्द कायम करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन 20 हजार रुपये घेताना इंदापूर येथील भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राजाराम दत्तात्रय शिंदे असे आरोपीचे नाव आहे. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (ACB arrests Assistant Sub-Inspector of Police for taking bribe of one thousand)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.