AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता चीन युद्धात उतरणार? तब्बल दोन हजार जहाजं…, जगभरात मोठी खळबळ

सध्या इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगाचं टेन्शन वाढलेलं असतानाच आता चीनमधून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! आता चीन युद्धात उतरणार? तब्बल दोन हजार जहाजं..., जगभरात मोठी खळबळ
Xi Jinping Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 5:34 PM
Share

एकीकडे अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर जगात तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जगभरात इंधनाचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. जग सध्या वेगळ्याच तणावात असातना आता चीनने जगाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. आता चीनकडून आशिया खंडात मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली आहे. इस्ट चायनाच्या एका सॅटेलाइट इमेजमुळे हा मोठा खुलासा झाला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या इमेजमध्ये चीनचे एकाचवेळी तब्बल दोन हजार मासे पकडणारे जहाजं सोबत दिसत आहेत. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे.

वृत्तसंस्था एएफपीने नासाच्या हवाल्यानं हे सॅटेलाईट चित्र प्रसारित केलं आहे. हे चित्र समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे. युद्धाच्या वेळी जपान, फिलिपाइन्स आणि तैवान यांचा मार्ग एकाच वेळी या ठिकाणावरून रोखता यावा यासाठी ही चीनची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीनने पूर्व चीनी समुद्रात 400 किलोमीटरपर्यंत या जहाजांची अशा पद्धतीने रचना केली आहे की, कोणत्याही दिशेनं शत्रू राष्ट्रांवर सहज हल्ला केला जाऊ शकतो. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, चीन सध्या एका मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. हे युद्ध भविष्यात तैवान, जपान किंवा फिलिफिन्सविरोधात होऊ शकतं.

चीनने मासे पकडणाऱ्या जहाजांचाच का वापर केला?

चीनची रणनिती स्पष्ट आहे. चीनने एकाचवेळी या रस्त्यावर दोन हजार जहाजं तैनात केले आहेत, या मागे दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे युद्धाच्या वेळी शत्रू राष्ट्रांचा रस्ता संपूर्णरित्या बंद करणं, यासाठी ही मासेमारी करणारे जहाजं सर्वात उत्तम पर्याय आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही एका मोठ्या युद्धाची तयारी करत आहोत, हे जगाला दाखवून देणं हा त्यामागे चीनचा उद्देश आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल