लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही असं म्हणालेल्या न्यायाधीशांना त्या जागेवरुन संपवलं पाहिजे: संभाजी भिडे

| Updated on: Jan 29, 2022 | 9:01 AM

लिव्ह इन रिलेशनशीप ( leave in relationship) अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही असं म्हणालेल्या न्यायाधीशांना त्या जागेवरुन संपवलं पाहिजे: संभाजी भिडे
संभाजी भिडे
Follow us on

सांगली: शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी न्यायाधीशांवर बोलताना एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लिव्ह इन रिलेशनशीप ( leave in relationship) अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असं आव्हान देखील संभाजी भिडे यांनी दिलं आहे. राज्यसरकारने सुपर मार्केटमध्ये देखील वाईनची विक्री (Wine Sale in Super Market) करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत पत्रकार परिषदेत संभाजी भिडे बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हे मंत्रिमंडळ बरखास्त करावे त्यांचा तो अधिकार आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळालेलं आहे. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी आहेत.त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घेऊन घटनेत दुरुस्ती करून घ्यावी, असं भिडे म्हणाले.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

लिव्ह इन रिलेशनशिप काय बेशरम आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडें यांनी केले आहे. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असेही संभाजी भिडे यांनी म्हटलंआहे.

महाराष्ट्र जर बेवकुफ झाला तर ते खपवून घेऊ नये

या देशातील सर्व दारू संपली पाहिजे. गांजा शेतीच्या का आडवे पडायचे. चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याशी आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय समजून सांगणार आहे. राज्याने असले बोलायचे नसते. समाजाला आपण दिशा द्यायची असते. हा निर्णय संताप जनक, नाश करणारा निर्णय आहे. मला भिमाची आठवण होते. जुगाराचे नादापायी शकुनी मामांनी सगळे हरण केले. पांडव सगळं हरले. बेशरम पणाने व्यसनाच्या आहारी जाऊन पत्नीला पणाला लावले. असेही ते म्हणाले आहेत. आर आर आबांनी डान्स बार बंद केले. आज आर आर आबा असते तर हा घातकी नीच निर्णय झाला नसता. यांच्यातून नेमके काय साधायचे आहे मला कळत नाही. अशी टीका त्यांनी केली आहे. हा निर्णय माघे घेण्यासाठी सर्वांनी उठले पाहिजे. महाराष्ट्र जर बेवकुफ झाला तर ते खपवून घेता कामा नये. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. अनेक संघटना या विषयी रस्त्यावर आल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्या:

राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, भाजपनंतर आता संभाजी भिडेही खवळले

‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Sambhaji Bhinde demanded judges who said leave in relation is not bad removed from post