AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, भाजपनंतर आता संभाजी भिडेही खवळले

संभाजी भिडेही (Sambhaji Bhide) वाईनच्या निर्णयावरून आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, भाजपनंतर आता संभाजी भिडेही खवळले
वाईनच्या निर्णयावरून संभाजी भिडे आक्रमक
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 5:31 PM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारने वाईन दुकानात (Wine in Store) आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी चौफेर टीकेची झोड उडवली आहे, सर्वात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्विट करत राज्य सरकारच्या या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला, त्यानतंर आता संभाजी भिडेही (Sambhaji Bhide) यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी आहेत. त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घटनेत दुरुस्ती करून घ्यावा, असेही ते म्हणाले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय चुकल्याचे स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी मांडले आहे. राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वच स्तरातून या निर्णयावर टीका होत आहे.

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. संभाजी भिडे यांचा चाहता मोठा तरुणवर्ग आहे, त्यामुळे संभाजी भिडे यांच्या या भूमिकेनंतर तरुणाई आक्रमक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले, मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचीच मुलं व्यसनाच्या आहारी जातील असे मत अनेक स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.

या देशातील सर्व दारू संपली पाहिजे. गांजा शेतीच्या का आडवे पडायचे. चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याशी आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय समजून सांगणार आहे. राज्याने असले बोलायचे नसते. समाजाला आपण दिशा द्यायची असते. हा निर्णय संताप जनक, नाश करणारा निर्णय आहे. मला भिमाची आठवण होते. जुगाराचे नादापायी शकुनी मामांनी सगळे हरण केले. पांडव सगळं हरले. बेशरम पणाने व्यसनाच्या आहारी जाऊन पत्नीला पणाला लावले. असेही ते म्हणाले आहेत. आर आर आबांनी डान्स बार बंद केले. आज आर आर आबा असते तर हा घातकी नीच निर्णय झाला नसता. यांच्यातून नेमके काय साधायचे आहे मला कळत नाही. अशी टीका त्यांनी केली आहे. हा निर्णय माघे घेण्यासाठी सर्वांनी उठले पाहिजे. महाराष्ट्र जर बेवकुफ झाला तर ते खपवून घेता कामा नये. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. अनेक संघटना या विषयी रस्त्यावर आल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

Wine in Maharashtra: भरकटलेल्या सरकारचा हा भरकटलेला निर्णय, बेवड्यांची काळजी, निर्णयानंतर भाजप आक्रमक

‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.