संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

साधारण दुपारी दोनच्या सुमारास संभाजीराजे कोपर्डीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. | Sambhajiraje Chhatrapati

संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार
संभाजीराजे छत्रपती
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 9:44 AM

अहमदनगर: संभाजीराजे छत्रपती शनिवारी कोपर्डीत येणार आहेत. यावेळी ते कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर संभाजीराजे यांच्याकडून मराठा आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. साधारण दुपारी दोनच्या सुमारास संभाजीराजे कोपर्डीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. कोल्हापुरात 16 जूनला हा मोर्चा निघेल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता संभाजीराजे पुण्यातून लाँग मार्च काढण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे 16 जून रोजीच्या कोल्हापुरातील मोर्चावर अनिश्चिततेचे सावट आहे.

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, त्यामधून फार काही हाती लागले नव्हते. त्यामुळे आता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यात शुक्रवारी नियोजित असलेली बैठक आता लांबणीवर पडली होती.

मात्र, उदयनराजे भोसले यांनी आपण लवकरच संभाजीराजे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. संभाजीराजे आणि मी भाऊ आहोत. मी प्रत्येक कार्यात त्यांच्यासोबत आहे. माझी कामं आटोपल्यानंतर दोन-तीन दिवसांत मी संभाजीराजे यांना भेटेने, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते.

मराठा क्रांती मूक मोर्चा ही वादळापूर्वीची शांतता, आता….

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका’

संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वात सोलापुरात तिसरा मराठा मोर्चा निघणार?

Udayanraje Update | मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे – उदयनराजे