भावाची वरात, सांगलीच्या पुरात, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं दाम्पत्य नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 28, 2021 | 12:06 AM

सांगलीच्या महापुरामध्ये एक लग्नानंतर नवरदेवाने बोटीतून नवरीचा गृह प्रवेश केल्याचा व्हिडीओ सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यावरून वर-वधुचं काही ठिकाणी अभिनंदन झालं तर काही जणांनी ट्रोल केलं आहे.

भावाची वरात, सांगलीच्या पुरात, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं दाम्पत्य नेमकं काय म्हणाले?
सांगलीतील व्हायरल नव दाम्पत्य
Follow us on

सांगली: सांगलीच्या महापुरामध्ये एक लग्नानंतर नवरदेवाने बोटीतून नवरीचा गृह प्रवेश केल्याचा व्हिडीओ सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यावरून वर-वधुचं काही ठिकाणी अभिनंदन झालं तर काही जणांनी ट्रोल केलं आहे. नवरदेवाने ठरलेल्या वेळेनुसार लग्नकार्य पार पडलं, त्यानंतर परिस्थितीशी सामना करत आमच्या घरात जाणे आम्हाला भाग होतं, पण हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल, असं वाटलं नव्हतं,पण आता छान वाटत असल्याची भावना रोहित सूर्यवंशी आणि सोनाली सूर्यवंशी या नवदांपत्याने व्यक्त केली आहे.

लग्न तर झालं गृहप्रवेशासाठी बोटीचा सहारा

सांगलीला महापुराचा विळखा पडला, या महापुरामध्ये जवळपास अर्ध्याहून अधिक शहर बुडले.तर शहरातील गावभाग या ठिकाणी राहणाऱ्या रोहित सूर्यवंशी याचा 26 जुलै रोजी महापुराच्या परिस्थिती मध्ये विवाह संपन्न झाला. नियोजित वेळेनुसार आणि तारखेनुसार हा विवाह पार पडला.त्यानंतर रोहित यानं आपली नववधू सोनाली हिच्यासह राहत असलेल्या घरात गृह प्रवेश करण्याचे ठरवले.कारण रोहित राहत असलेले घर उंचावर असल्याने घरी जाण्याचे निश्चित केले.मात्र, आसपास पाण्याचा विळखा असल्याने घरापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना बोटीचा सहारा घ्यावा लागला.

व्हिडीओ व्हायरल

वर-वधूंची वरात बोटीतून महापुराचे पाणी भेदत पोहोचली,जाताना वधु- वरांनी पुराच्या पाण्यात असलेल्या मारुती चौक येथील मंदिराचं दर्शनही घेतले आणि आपल्या घरी पोहोचले देखील.यासर्व घटनेचा व्हिडीओ रोहितच्या नातेवाईक व मित्रांनो काढत,सोशल मीडियावर व्हायरल केला होता.बघता-बघता महापुराच्या पाण्यातून बोटीतून अनोख्या वरातीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.”भावाचा नाद खुळा”,भावाची वरात पुरात,अशा मिम्स बनल्या, पण दुसऱ्या बाजूला पुरात लग्नाची घाई कश्यासाठी ? अशा पद्धतीचे ट्रोल करणारे कमेंट देखील पडता आहेत.


नवदाम्पत्य काय म्हणाले?
नवरदेव रोहित सूर्यवंशी म्हणाला,26 जुलै रोजी माझा विवाह ठरला होता.तो नियोजित तारखेनुसार पार पडला,विवाह सोहळा झाल्यानंतर गृह प्रवेश हा आपल्याच घरात झालं पाहिजे,कारण की मी ज्या ठिकाणी राहतो,त्या ठिकाणी पुराचे पाणी आलं नव्हतं,पण घरात फक्त बोटीतून जावं लागतं लागणार होतं, त्यामुळे केवळ जी परिस्थिती होती,त्याला आम्ही सामोरे गेलो.त्यावेळी असं वाटलं नव्हतं की,हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होईल,आणि लोक त्याला ट्रोल ही करतील,पण जी परिस्थिती होती. त्यानुसार आम्ही त्याला सामोरे गेलो, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने,छान वाटत आहे,अशी भावना रोहित यांनी व्यक्त केली आहे

नववधू सोनाली म्हणाली, 26 जुलै रोजी विवाह झाला त्या नंतर ग्रह प्रवेश करण्याचं ठरलं सुरुवातीला बोटीतून जाताना भीती वाटली रोहित सोबत असल्याने काही वाटले नाही.आणि घरात प्रवेश केल्याचा आनंद झाला.ठेवत असताना आमचा बोटीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी काही वाटलं नाही पण तू खूप लोकांनी पाहिला पण खूप बरं वाटलं आणि इतका व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं,पण छान वाटतंय असं सोनाली यांनी सांगितले.

महापुराच्या परिस्थिती मध्ये पार पडलेला हा लग्न सोहळा, त्यानंतरचा गृह प्रवेश,तोही थेट महापुराच्या बोटीतुन, त्यामुळे रातोरात पुरातुन बोटी मधून वरात काढणारी ही जोडी रातो-रात प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.जरी रोल ट्रोल होत असले,तरी या जोडप्याने त्याकडे दुर्लक्ष करत येत असलेले अनुभव छान आसल्याची भावना व्यक्त केली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Flood : घर-दुकानात पाणी शिरलेल्यांना 10 हजार, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार, पूरग्रस्तांना मदत जाहीर

रक्ताचं पाणी करुन जमवलेला संसार महापुराने नेला, झोपडीतली प्रियांका नवऱ्याला म्हणते, ‘चिंता नाय करायची, लढायचं!’

Sangli Newly married couple video viral on social media Rohit Suryawanshi and Sonali Suryawanshi said it is not pre planned