Nandurbar water scarcity | नंदुरबारच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; जिल्हा प्रशासनाचा 238 गावांमध्ये विहिरी अधिग्रहनाचा प्रस्ताव

| Updated on: May 08, 2022 | 9:46 AM

धडगाव तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी दिली आहे.

Nandurbar water scarcity | नंदुरबारच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; जिल्हा प्रशासनाचा 238 गावांमध्ये विहिरी अधिग्रहनाचा प्रस्ताव
नंदुरबारच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई
Image Credit source: t v 9
Follow us on

 नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानात सोबत पाण्याच्या बाष्पीभवनातही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बारा लघुसिंचन (Irrigation Project) प्रकल्पात आजच्या स्थितीला अवघा 11 टक्के जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस नवापूर तालुक्यात झाल्याने नवापूर तालुक्यात पाणीटंचाई गंभीर स्वरूपाचे होऊ शकते. जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) वतीने योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 238 गावांत विहीर अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील काही ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा (Tanker Water Supply) करावा लागणार आहे.

पाऊस कमी पडल्याने टंचाई

धडगाव तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी दिली आहे.  यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात सगळ्यात कमी पाऊस पडला. त्यामुळं विहिरी अधिग्रहण करण्याच निर्णय घ्यावा लागतोय. 238 गावांत विहिरी अधिग्रहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संख्येत वाढ होण्याची शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल

उन्हाळ्यात जास्त पाण्याचा वापर करावा लागतो. बाष्पीभवनानं पाणी कमी होतं. अशावेळी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात टँकरची संख्या कमी आहे. धडगावला डोंगराळ भाग असल्यामुळं त्या भागात टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो. पाच-सहा गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करावा लागेल. तडोजा, नंदुरबार, नवापूर, धडगाव या तालुक्यांत पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी हे नियोजन केल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा