शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा, परभणीत एकच जल्लोष, खासदारांकडून ‘उद्धवसाहेबांना धन्यवाद’

| Updated on: Sep 17, 2021 | 12:08 PM

आज मराठवाडा मुक्तीदिनी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर परभणीत जोरदार जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे परभणीकरांनी उत्साहात स्वागत केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा, परभणीत एकच जल्लोष, खासदारांकडून उद्धवसाहेबांना धन्यवाद
परभणीत शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.
Follow us on

परभणी : आज मराठवाडा मुक्तीदिनी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर परभणीत जोरदार जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे परभणीकरांनी उत्साहात स्वागत केले. तसंच परभणीचे सेना खासदार बंडू जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

मुख्यमंत्र्यांकडून परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरु होती. सुरुवातीला मोर्चा तसेच धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम, धरणे आंदोलन पार पडले. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्याने एका महत्त्वाच्या विषयाला यशस्वी पूर्णविराम मिळाला आहे.

आंदोलने, मोर्चे आणि सह्यांच्या मोहिमा, अखेर परभणीकरांचा विजय

खासदार बंडू जाधव यांच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टोलेजंग मंडप उभारून काही दिवस धरणे आंदोलन पार पडले. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयासंबंधी सार्वजनिक- खाजगी भागीदारीचे (पीपीपी) धोरण जाहीर केले होते. पाच दिवसांच्या धरणे आंदोलनानंतर खासदार बंडू जाधव यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु त्यांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले. याच दरम्यान राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणा केल्याने परभणीकरांचा विजय झाला आहे.

परभणीत फटाके फोडून, पेढे वाटून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं स्वागत

परभणी संघर्ष समितीच्या वतीनेही सातत्याने या विषयावर ठोस भूमिका घेण्यात आलेली होती. जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी आग्रही भूमिका घेतल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना परभणीकर यांच्या भावनेचा विचार करावा लागला. परभणी शहरातील वसमत रोडवरील खासदार बंडू जाधव यांच्या संपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी खासदार बंडू जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

– मराठवाड्यासाठी संतपीठ व्हावं
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप उभारणार
– औरंगाबादला पर्यटन समृद्ध
– परभणीत शासकीय महाविद्यालय

(Shivsena MP bandu jadhav Say thank you Cm Adter Uddhav Thackeray Announced Parbhani Government medical College)

हे ही वाचा :

LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यासाठी 8 मोठ्या घोषणा