Sindhudurg: शिंदुर्ग इमानतळावरच वाघाचो आवाज काडनारो यंत्र कित्या बसईलो? वाईज इषय झालो तरी काय?

विमान लँडिंग होत असताना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून हा आवाज वाजवला जातो.

Sindhudurg: शिंदुर्ग इमानतळावरच वाघाचो आवाज काडनारो यंत्र कित्या बसईलो? वाईज इषय झालो तरी काय?
काय आहे नेमकं प्रकरण?
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 2:41 PM

सिंधुदुर्ग : तळकोकणात (Konkan Chipi Airport) सुरु झालेल्या विमानतळावर चक्का वाघाची डरकाळी काढणारं यंत्र बसवण्यात आलं आहे. या यंत्राची अख्ख्या कोकणात (Sindhudurg News) चर्चा रंगली आहे. चक्क विमानतळावर येणाऱ्या कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही नामी शक्कल लढवण्यात आली आहे. या डरकाळीच्या आवाजानं खरोखर विमानतळावर वाघ (Tiger) आहे की काय? अशी शंका कुणालाही येईल. खरंतर यााआधीही कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फटाक्यांचा वापर करण्यात आला होता. तसंच सापळेही रचण्यात आले होते. दरम्यान, याचा कोणताच परिणाम कोल्ह्यांवर झाला नाही. म्हणून आता चक्क वाघाच्या डरकाळीचा आवाज काढणारं यंत्र बसवण्यात आलं आहे.

कोल्ह्यांचं भय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरु झालंय. माळरानावर वसलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर चक्क कोल्हे येऊ लागलेत. ही बाब स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे विमानतळ प्रशासनानं यावर नामी युक्ती लढवलीय. वाघाच्या डरकाळीने कोल्हे घाबरुन पळून जातील, या विचारानं अनोखी शक्कल विमानतळ प्रशासनाने लढवली आहे. वाघाच्या डरकाळीचा आवाज येत असल्याचं पाहून कोल्हे फिरकणार नाहीत, असा विश्वास वन विभागालाही वाठतोय.

नामी शक्कल

सिंधुदुर्ग विमानतळावरील धावपट्टीवर येणारे कोल्हे पळविण्यासाठी ही नामी शक्कल यंत्रणेने लढविली आहे. विमान लँडिंग होत असताना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून हा आवाज वाजवला जातो. ही डरकाळी खरीखुरी असल्याचा भास सगळ्यांनाच होतो. दरम्यान, याआधी खरंतर यापूर्वी वनविभागाने या कोल्ह्याचा बंदोबस्थ करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले होते. पण त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता.

परिणाम होणार?

सापळे लावणं, फटाके फोडणं, असे उपाय कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून करण्यात आलेला होता. मात्र याचा कोणताच परिणाम न झाल्याने अखेर वाघाच्या डरकाळीची शक्कल वनविभागाने आणि विमानतळ यंत्रणेने लढविली आहे. आता याला तरी कोल्हे घाबरतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.