राज्यातील मृतांचा आकडा 44 वर, तळीयेत दरड कोसळून भीषण दुर्घटना : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 23, 2021 | 2:25 PM

महाड तालुक्यातील (Mahad) तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा (Taliye Landslide) मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे.

राज्यातील मृतांचा आकडा 44 वर, तळीयेत दरड कोसळून भीषण दुर्घटना : विजय वडेट्टीवार
महापूर,विजय वडेट्टीवार
Follow us on

रायगड : महाड तालुक्यातील (Mahad) तळीये गावात भीषण दरड कोसळून 36 जणांचा (Taliye Landslide) मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे.

तळीये गावात काल म्हणजेच 22 जुलैला दुपारी चारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. इतके तास होऊनही राज्य सरकारला या दुर्घटनेचा थांगपत्ताही नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही आमदारांसह तळई गावात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा सतांप तळई गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर, भाजप आमदार गिरीश महाजन हे या गावात आहेत.

प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 80 लोक दबले गेल्याची माहिती ग्रामस्थांनी केली आहे. आतापर्यंत 36 बॉडी हाती लागल्या आहेत. मात्र इतकं निर्लज्ज सरकार, प्रशासन आहे की त्यांना या घटनेची माहितीच नाही. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली तरी अजून मदत मिळू शकलेली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यात पुराची भीषण स्थिती असल्यामुळे रस्ते बंद आहेत, शक्य तितकी लवकर मदत पोहचवत आहोत, असं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं.

VIDEO : तळीये गावात भीषण दुर्घटना

संबंधित बातम्या 

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Raigad Talai Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले

हा पाऊस पाहता अतिवृष्टीची व्याख्याच बदलावी लागेल; डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करणार: उद्धव ठाकरे