Raigad Taliye Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले

महाडच्या तळीये गावात काल संध्याकाळी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला असून दरडीखाली 80 ते 85 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Raigad Taliye Landslide Maharashtra)

Raigad Taliye Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले
Raigad Talai Landslide
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 3:25 PM

महाड: महाड तालुक्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. महाडच्या तळीये गावात काल संध्याकाळी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला असून दरडीखाली 80 ते 85 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना काल घडूनही आजपर्यंत म्हणजे गेल्या 19 तासानंतरही गावकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यावर स्थानिक गावकरी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी केली. (Raigad Taliye Landslide Maharashtra: 32 killed in Raigad landslides, pravin darekar reached at mahad)

काल सायंकाळी 4 वाजता ही दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडी खाली 35 घरे दबली गेली. त्यामुळे या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 लोकांचे मृतदेह बाजूला काढले. पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत होता. दरडीखाली असून 80 ते 85 लोक दबले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

ठाण्यातून तरुण मदतीसाठी आले

काल सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली आहे. 4 वाजल्यापासून आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंबहुना गावाचा तलाठी सुद्धा पोहोचला नाही. आज सांगतात संपर्क साधू शकत नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे. परंतु दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफ ची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुलं मदतीला आली, दिलासा देण्याचं काम त्या तरुणांनी केल, ग्रामस्थांना स्थलांतर करत त्यानं तेथून बाहेर काढले त्यामुळे त्यांनी दिलासा दिला असून प्रशासकीय अधिकार न आल्यामुळे ही शरम वाटणारी गोष्ट आहे. अनेक दिवसापासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून आम्ही सुद्धा सांगितलं होते की, कोकणात सुविधा बळकट करा, त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते परंतु एवढी बेपर्वाई प्रशासनाची लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच पाहिलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

सरकार 5 लाख देतील 10 लाख देतील परंतु गेलेलं जीव परत येणार नाही. प्रशासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचले नव्हते. आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचले. त्यामुळे नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा आणि खाण्याचे आणी पिण्याची व्यवस्था करा. असे आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.

आम्ही पोहोचू शकतो, अधिकारी का येऊ शकत नाही

या घटनेची माहिती मिळताच महाडच्या दौऱ्यावर असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तळीये येथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांची माहिती घेतली. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. आज सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून आता त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे. प्रशासन झोपलं आहे का?, असा संताप दरेकर यांनी व्यक्त केला. आम्ही मुंबईवरून तळीयेमध्ये पोहोचू शकतो तर प्रशासनाचे अधिकारी आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी का पोहोचू शकली नाही, असा सवाल दरेकर यांनी केला.

निर्लज्ज आणि बेशरम सरकार

या दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्यात यावी, तसेच दुर्घटेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एवढी मोठी दुर्घटना घडून एकही अधिकारी घटनास्थळी येत नाही. हे सरकार निर्लज्ज आणि बेशरम आहे, यांना लाजा वाटत नाही का?, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

फडणवीसांनी पंतप्रधानांशी बोलावं

या दुर्घटनेत 80 लोक दबल्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. ही घटना मोठी आणि दुर्देवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असं ते म्हणाले. तर नेटवर्क नसल्याने कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही. पाऊस आणि पूर यामुळे या गावात पोहोचणं शक्य नव्हतं, असं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं. (Raigad Taliye Landslide Maharashtra: 32 killed in Raigad landslides, pravin darekar reached at mahad)

VIDEO : रायगड तळई दुर्घटनेचा व्हिडीओ

संबंधित बातम्या:

Raigad Satara landslide live : रायगड आणि साताऱ्यात भीषण दुर्घटना, दरडी कोसळून 50 पेक्षा अधिक मृत्यू

Maharashtra Rains : राधानगरीचे दरवाजे उघडणार, कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार?; नेव्ही, आर्मी सज्ज

VIDEO | 11 प्रवाशांचा जीव धोक्यात घालत वाहत्या पाण्यातून बस दामटवली, आणि…

Raigad Talai Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळई गावात भीषण दुर्घटना

(Raigad Taliye Landslide Maharashtra: 32 killed in Raigad landslides, pravin darekar reached at mahad)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.