AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये भीषण अपघात, भरधाव वेगाने येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या !

दोन कार विरुद्ध दिशेने आपापल्या मार्गाने भरधाव वेगात चालल्या होत्या. स्विफ्ट चालक कामावर चालला होता, तर ईर्टिकामधील कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमाला चालले होते. मात्र दोघेही आपापल्या ठिकाणी पोहचण्याआधीच भयंकर घटना घडली.

नांदेडमध्ये भीषण अपघात, भरधाव वेगाने येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या !
नांदेडमध्ये दोन कारच्या धडकेत 10 जण जखमीImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 18, 2023 | 4:33 PM
Share

नांदेड / राजीव गिरी : नांदेड जिल्ह्यातील तामसा ते नांदेड रोडवर दोन कारच्या आमनेसामने झालेल्या धडकेत एकूण दहा जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना तामसा इथल्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलवण्यात आलंय. दोन्ही कार भरधाव वेगात असताना हा अपघात झाल्याने दोन्ही गाड्यांचे जबर नुकसान देखील या अपघातात झालंय. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण जखमी झाले असून, दुसऱ्या कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. नांदेडहुन हदगावकडे एका घरगुती कार्यक्रमाला कुटुंबीय आपल्या कारने चालले होते. मात्र कार्यक्रमाला पोहचण्याआधीच त्यांच्या कारला अपघात झाला.

जखमींवर प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलवले

सचिन साहेबराव कारले, विशाल भिमा बिमलवाड, कांता दत्ता बिमलवाड, आशुतोष निलोडवाड, पदमीन राम बिम्मलवाड, आकांक्षा बिम्मलवाड, वर्षा बाळू बिम्मलवाड, दत्ता बिम्मलवाड, शांताबाई सोनुले, चंद्रकलाबाई निलोडवाड अशी‌ जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी तामसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तामसा प्राथमिक उपचार करुन जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले.

इर्टिकामधील सर्व कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते

हदगाव तालुक्यातील कांडली खुर्द येथील सचिन साहेबराव कारले याचा मोटर रिवायडींगचा नांदेड येथे व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास समोरून येणारी ईर्टीका कार आणि सचिन कारले यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. त्यात ईर्टीका कारमधील नऊ जण जखमी तर स्विफ्ट डिझायरमधील सचिन कारले असे एकूण दहा जण जखमी झाले. ईर्टीका वाहनामध्ये सात महिला, एक 15 वर्षाचा मुलगा आणि ड्रायव्हर असे मिळून नऊ जण होते. हे सर्व जण नांदेडहून हदगावला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार