VIDEO | तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, एका कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू, 4 जखमी

पालघर येथील तारापूर एमआयडीसीमधील जखारिया लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये मोठा ब्लास्ट झाला. यामध्ये एका कामगाराचा मुत्यू झालाय, तर 4 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्लास्टनंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या अजून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

VIDEO | तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, एका कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू, 4 जखमी
Tarapur MIDC Blast
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 8:45 AM

पालघर : पालघर येथील तारापूर एमआयडीसीमधील जखारिया लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये मोठा ब्लास्ट झाला. यामध्ये एका कामगाराचा मुत्यू झालाय, तर 4 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्लास्टनंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या अजून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

तारापूर एमआयडीसी परिसरातील प्लॉट जे-1 मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला. कंपनीच्या बॉयलरमध्ये ब्लास्ट झाला. ब्लास्ट इतका भयंकर होता की त्यानंतर कंपनीला भीषण आग लागली. या ब्लास्टची तीव्रता इतकी होती की त्याचा आवाज 4 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे, तर चार कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर बोईसरमधील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. भीषण स्फोटाने तीन ते चार किलोमीटरच्या परिसराला हादरला बसला आहे.

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट

यापूर्वीही 4 जुलैला तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

Tarapur MIDC Blast | तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, चार गंभीर

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश