Tarapur MIDC Blast | तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, चार गंभीर

नांडोलीय ऑर्गेनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सायंकाळी साडे सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला.

Tarapur MIDC Blast | तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, चार गंभीर

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला (Tarapur Chemical Blast). या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत (Tarapur Chemical Blast).

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नांडोलीय ऑर्गेनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सायंकाळी साडे सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर आणि किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी कंपनीत एकूण 20 कामगार काम करीत होते. या स्फोटाचा आवाज 10 किलोमीटरवर असलेल्या पालघर शहरात देखील प्रकर्षाने जाणवला.

रिअ‍ॅक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्फोट

रासायनिक प्रक्रियेदरम्यान, रिअ‍ॅक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता होता. मात्र, आता त्याचाही मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या दोन झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध घेत होते. त्यादरम्यान त्यांना कामगाराचा मृतदेह सापडला आहे (Tarapur Chemical Blast).

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *