घरची परिस्थिती हालाखीची, त्यात कोरोनाची वक्रदृष्टी, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ

| Updated on: Aug 08, 2021 | 9:10 AM

नांदेडमध्ये एका राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्याला पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी लागत असल्याचं समोर आलंय. एजाज नदाफ या शाळकरी विद्यार्थ्याला राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते 2018 ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

घरची परिस्थिती हालाखीची, त्यात कोरोनाची वक्रदृष्टी, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ
Follow us on

नांदेड : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक रोजगार संकटात सापडलेत. सगळ्या क्षेत्रावर कोरोनाची वक्रदृष्टी पडलीय. अनेकांच्या हातचे रोजगार गेलेत. अनेकांना आपला पेशा सोडून दुसरी नोकरी किंवा उद्योग सुरु करावा लागला. मात्र नांदेडमध्ये एका राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्याला पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी लागत असल्याचं समोर आलंय.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मजुरीची वेळ

अर्धापुर तालुक्यातील पार्डी येथे 2018 साली नदीच्या वाहत्या प्रवाहात दोन मुलीचा जीव वाचवणाऱ्या एजाज नदाफ या शाळकरी विद्यार्थ्याला राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते 2018 ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी एजाज हा केवळ 15 वर्षाचा होता. तो पार्डी येथील रहिवासी असून आज रोजी एजाजच्या परिवारावर संकट आलंय. सध्या एजाज ला पोटाची खळगी भरण्यासाठी केळी च्या गाड़ीवर मजुरी करावी लागतेय.

पोटाची खळगी भरण्यासाठी केळीच्या गाड्यावर मजुरी

अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या एजाज नदीफचे आई वडील शेतात मजुरी करीत असतात, सध्या त्याच्याकडे 12 वी ची परीक्षा फीस भरण्यासाठीही पैसे नव्हते. यंदा बारावीत एजाजला 82 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालाय. तो सध्या केळीच्या गाड्यावर काम करतो आहे.

शासन प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात पण प्रत्यक्षात काहीच नाही!

जिल्हा परिषदेने यापूर्वी एजाज नदाफला घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तेही आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यासोबतच नोकरीही देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्या परिवाराकडे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे प्रमाणपत्र ठेवण्यासाठी साधे कपाटही नाही. एजाज नदाफ आणि त्याचा परिवार शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत.

(Time to labour work on National Child Bravery Award winner Ejaz nadaf)

हे ही वाचा :

कोरोनाचा प्रकोप आणि महापुराचा हाहाकार, वाढदिवस साजरा करणार नाही; खासदार चिखलीकरांचा जन्मदिन ‘सेवा सप्ताह’

वृक्षारोपण मोहिम कागदावर, नांदेडमध्ये लागवडीसाठी आलेली रोपं रस्त्याच्या कडेला फेकून दिली!