वृक्षारोपण मोहिम कागदावर, नांदेडमध्ये लागवडीसाठी आलेली रोपं रस्त्याच्या कडेला फेकून दिली!

नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा फज्जा उडालाय. लागवडीसाठी आलेली रोपे रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

वृक्षारोपण मोहिम कागदावर, नांदेडमध्ये लागवडीसाठी आलेली रोपं रस्त्याच्या कडेला फेकून दिली!
सामाजिक वनीकरण विभागाचा भ्रष्टाचार
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 9:33 AM

नांदेड : जिल्ह्यातील भोकरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा फज्जा उडालाय. लागवडीसाठी आलेली रोपे रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी तक्रारीनंतर सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितलंय.  एका आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर वनीकरण विभागाचा हा अपहार उघड झालाय.

झाडं लावण्यासाठी खड्डे खोदले, रोपं मिळाली तर रस्त्यावर फेकली!

नांदेडमध्ये वृक्षारोपण मोहीम कागदावरच राबवली जात असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्याने केलीय. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण देखील केलं, मात्र भोकर तालुक्यातील या भ्रष्टाचाराकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. भोकर तालुक्यात झाडे लावण्यासाठी केवळ खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत तर लागवडीसाठी आलेली रोपटे फेकून दिल्याचा प्रताप इथे करण्यात आलाय.

सामाजिक वनीकरण विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

त्यामुळे भोकर तालुक्यात वृक्ष लागवड निव्वळ देखावा असल्याचे चित्र आहे. सामाजिक वनीकरण विभागाचा हा भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला असून तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ वनीकरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

(Corruption of social forestry department In nanded bhokar)

हे ही वाचा :

निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पारंपारिक शेतीला फाटा, ‘ड्रॅगन फ्रूट’चा मळा बहरला, डॉक्टरसाहेब म्हणतात, ‘हेच पीक घ्या’

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करा, आमदार जवळगावकर वडेट्टीवर-अशोक चव्हाणांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.