निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पारंपारिक शेतीला फाटा, ‘ड्रॅगन फ्रूट’चा मळा बहरला, डॉक्टरसाहेब म्हणतात, ‘हेच पीक घ्या’

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी आधुनिकतेची कास धरत पारंपारिक शेतीला फाटा देऊन ड्रॅगन फ्रुटचा (Dragon Fruit) मळा फुलविला.

निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पारंपारिक शेतीला फाटा, 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा बहरला, डॉक्टरसाहेब म्हणतात, 'हेच पीक घ्या'
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी आधुनिकतेची कास धरत पारंपारिक शेतीला फाटा देऊन ड्रॅगन फ्रुटचा (Dragon Fruit) मळा फुलविला.
राजीव गिरी

| Edited By: Akshay Adhav

Jul 28, 2021 | 9:18 AM

नांदेड : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी आधुनिकतेची कास धरत पारंपारिक शेतीला फाटा देऊन ड्रॅगन फ्रुटचा (Dragon Fruit) मळा फुलविला. वैद्यकीय क्षेत्रात 33 वर्षांची सेवा बजावल्यानंतर ते शेतीकडे वळले आहेत.

थायलंडच्या धर्तीवर अर्धापूर तालुक्यातील लहान येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी 33 वर्षाच्या सेवानिवृत्त नंतर आपल्या कर्मभूमीत लहान येथे शेती करत आहेत. त्यांची परिसरात 18 एकर शेती आहे .त्यापैकी 2 एकर मध्ये त्यांनी अधुनिकतेला जोड देत ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात दुर्मीळ समजलं जाणारं पीक पण आता शेतकऱ्यांमध्ये जागरुकता

ड्रॅगन फ्रूट महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारे पीक समजले जाते. साधारणपणे थायलंड या देशात याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पिकाची लागवड वेल स्वरूपाची असल्याने शेतात सिमेंटचे खांब उभे करून रोपांची लागवड केली जाते. लागवडीनंतर एका वर्षाला फळ धारणा सुरू होते. 20 ते 25 वर्षे उत्पन्न घेता येते.

ड्रॅनग फ्रुटला चांगला भाव

निवडुंगासारख्या दिसणा-या काटेरी वेलाला साधारणपणे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान फळे येतात. एका झाडापासून तयार वेलींना एका तोडनिस सहा ते आठ फळे येतात (एकुण १०० फळे येतात). एका फळास त्यांच्या दर्जानुसार प्रती किलो साधारणपणे १०० ते १५० रुपये भाव मिळतो.हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढविते,पांढऱ्या पेशींची वाढ होते यामुळे आरोग्यासाठी महत्त्वाचे समजले जात असल्याने बाजारात चांगली मागणी असते.

कमी खर्च, परवडणारं पीक

जुलै 2019 मध्ये रोपांची लागवड केल्यानंतर एक वर्षानंतर फळधारणेला सुरुवात होते. या फळांमध्ये लाल रंगाच्या फ्रुटची लागवड केली आहे. या पिकावर मुख्य करून लाल मुंग्या व बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. परंतु, अत्यंत कमी खर्चाची फवारणी करून ते लवकर नष्ट होते.व अन्य खर्च कमी असल्याने हे पीक परवडणारे आहे.

एका फ्रुटचे 400 ते 600 ग्राम वजन

दोन एकर क्षेत्रामध्ये दहा बाय आठ अशा पद्धतीने एकरी सिमेंटचे सहाशे पोल बसविण्यात आले आहेत. दोन एकर क्षेत्रामध्ये 4 हजार 800 झाडांची लागवड करण्यात आली आहे.

करोना आजारावर लाभदायी

रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते यामुळे ड्रॅगन फ्रुट करोना आजारावर लाभदायी आहे.

ड्रॅनग फ्रुटला सगळीकडून मागणी

सांगली, कोल्हापूर, पुणे,हैदराबाद, नांदेड आदी ठिकाणी बाजार पेठेत चांगला भाव मिळतो. याचबरोबर परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

कमी खर्चात जास्त उत्पन्न, आधुनिक शेतीकडे वळा, डॉक्टरसाहेबांचा मंत्र

कमी खर्च होत असल्याने, आरोग्यासाठी लाभदायक असल्याने बाजारात मागणी आहे.कमी खर्चात उत्पन्नही चांगले मिळते. परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करत आधुनिक शेतीकडे वळावे यामुळे उत्पन्नात वाढ होईल, अशी प्रतिक्रिया ड्रॅनग फ्रुटची लागवड केलेले शेतकरी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी दिली.

(Dragon Fruit Farming in nanded Ardhapur By Dr Uttamrao Ingale)

संबंधित बातमी :

उत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ड्रॅगन फळ; अशाप्रकारे करा या फळाचे सेवन

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें