Video : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

| Updated on: Jul 18, 2021 | 10:11 AM

रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केलीय. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Tourists flock to Sahastrakund Falls in Nanded due to Sunday holiday)

Video : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
सहस्त्रकुंड धबधबा
Follow us on

नांदेड : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केलीय. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या जलधारांचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आज पर्यटकांनी इथे गर्दी केलीय…

जाणून घ्या सहस्त्रकुंड धबधब्याविषयी…

यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे 125 कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ‘इस्लापूर पाटी’ पासून ५ कि.मी तर किनवटपासून 50 कि.मी. अंतरावर आहे.

सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. मराठवाडा-विदर्भाची सीमारेषा म्हणजे पैनगंगा नदी आहे. मराठवाड्यातील हिंगोली नांदेड जिल्ह्याला लागून ही नदी वाहते. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो. हा धबधबा उमरखेड पासून 70 किलो मीटर वर तर जिल्हा मुख्यालयापासून 181 किमीवर आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसतं.

(Tourists flock to Sahastrakund Falls in Nanded due to Sunday holiday)

हे ही वाचा :

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी