नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड

| Updated on: Oct 13, 2021 | 2:19 PM

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड झालीय. आज ऑनलाईन पद्धतीने महापौर पदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली, त्यात महापौर पदासाठी जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड
नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड झालीय.
Follow us on

नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड झालीय. आज ऑनलाईन पद्धतीने महापौर पदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली, त्यात महापौर पदासाठी जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे, पालिकेतील 82 पैकी 73 जागा काँग्रेसकडे आहेत . त्यामुळे विरोधकानी महापौर पदासाठी उमेदवार देखील दिला न्हवता. दरम्यान, स्वच्छता , पाणी आणि रस्ते दुरुस्तीसह शहर शुशोभीकरनाला प्राध्यान असेल, असे नूतन महापौरांनी सांगितलंय.

महापौर जयश्री पावडे यांना सव्वा वर्षांचा काळ मिळणार

महापौर म्हणून जयश्री पावडे यांना उर्वरित सव्वा वर्षांचा काळ मिळणार आहे. त्या नंतर नांदेड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने पावडे यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. काँग्रेसचे निष्कलंक आणि युवा लोकप्रिय नेतृत्व असलेल्या निलेश पावडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि कुटुंबाच मोठं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच मंत्री अशोक चव्हाण यांनी या टर्म मधल्या अखेरच्या महिला महापौर म्हणून जयश्री पावडे यांची निवड केलीय.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे नेत्यांचे लक्ष

नांदेड उत्तर विधानसभा हा काँग्रेसचा गड होता. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या डी.पी सावंत यांचा सेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी पराभव केला. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात प्राबल्य वाढावे यासाठी काँग्रेसने जयश्री पावडे यांना संधी दिल्याचे बोलल्या जातेय. नांदेड उत्तर मतदारसंघात पावडे यांचा मोठा गट असून मतदारसंघात निर्णायक गट म्हणून ओळखल्या जातो.

याच गटात आपल्या शांत स्वभावामुळे निलेश पावडे यांनी आगळंवेगळं स्थान प्रथापीत केलय. त्यामुळे हा गट सक्रिय रहावा यासाठी महापौर पद देण्यात आल्याचे राजकीय निरीक्षकांच म्हणणं आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपला गड पुन्हा ताब्यात घेऊ शकतो.

(Unopposed election of Jayashree Pavade of Congress as the Mayor of Nanded Municipal Corporation)

हे ही वाचा :

‘अजुनी यौवनात मी’, खासदार संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला

‘महापौर शिवसेनेचा असावा ही पुणेकरांची इच्छा’, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य; मतविभागणी होणार नसल्याचाही दावा