माझे महात्मा गांधी फक्त राज ठाकरे, रामदास कदम यांच्या टीकेला खेडेकरांचं जोरदार प्रत्युत्तर

माझे महात्मा गांधी फक्त राज ठाकरे, रामदास कदम यांच्या टीकेला खेडेकरांचं जोरदार प्रत्युत्तर
vaibhav khedekar

शिवसेना नेते अनिल परब हे राष्ट्रवादीचे संजय कदम आणि मनसेच्या वैभव खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी जोरदार टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 18, 2021 | 5:28 PM

रत्नागिरी: शिवसेना नेते अनिल परब हे राष्ट्रवादीचे संजय कदम आणि मनसेच्या वैभव खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी जोरदार टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली होती. त्याला मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे हेच माझे महात्मा गांधी आहेत. इतर कुणी नाही, असा टोला वैभव खेडेकर यांनी लगावला आहे.

रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून आहेत. माझे महात्मा गांधी एकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते? मातोश्री किंवा शिवसेनेचा आदेशही ते पाळत नाहीत. ही तर त्यांची कदम सेना आहे, असा टोलाही खेडेकर यांनी लगावला.

कदमांची किंमत शून्य

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनीही कदम यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास कदमांची अवस्था न घरका न घाटका अशी झाली आहे. आता ते संपले आहेत.त्यांची किंमत शून्य झाली आहे, असा हल्लाच निलेश राणेंनी चढवला आहे.

कदमांची अवस्था ना घर का, ना घाट का

रामदास कदम यांनी नारायण राणेंवर टीका करण्याचं काम केलं. कारण त्यांना मातोश्रीतून बक्षीस हव होतं. त्यांनी विरोधी पक्षनेते पद मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं. आज त्यांची शिवसेनेमध्ये न घर का न घाटका अशी अवस्था झाली आहे. ते आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्यच राहील. ती त्यांनीच करून घेतली आहे. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही हे रामदास कदम यांना आता कळून चुकलं असेल, असा चिमटाही त्यांनी लगावला. शिवसेनेतून सर्वात आधी रामदास कदम यांचीच हकालपट्टी करायला हवी होती. कारण रत्नागिरीत राष्ट्रवादीला मदत करणारा नेता म्हणजेच रामदास कदम आहे, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल

Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

VIDEO: सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं वाईट वाटलं; रामदास कदम यांची नेमकी खदखद काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें