शेतात काम करणाऱ्या तरुणीवर बिबट्याची झडप, कळशीच्या एका फटक्यात बिबट्याचं डोकं फोडलं, जीवन मरणाचा थरार

| Updated on: Oct 26, 2021 | 12:34 PM

शेतात काम करणाऱ्या एका तरुणीने थेट बिबट्याशी दोन हात करत आपला जील वाचवल्याची थरारक घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड येथे ही घटना घडली आहे.

शेतात काम करणाऱ्या तरुणीवर बिबट्याची झडप, कळशीच्या एका फटक्यात बिबट्याचं डोकं फोडलं, जीवन मरणाचा थरार
Girl fought with Leopard
Follow us on

यवतमाळ : शेतात काम करणाऱ्या एका तरुणीने थेट बिबट्याशी दोन हात करत आपला जील वाचवल्याची थरारक घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड येथे ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं, तरुणीने आपला जीव कसा वाचवला?

महागाव तालुक्यातील करंजखेड येथे वृषाली नीलकंठ ठाकरे ही तरुणी शेतात काम करत होती. शेतात काम करत असताना अचानक एका बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी या तरुणीने मोठं शौर्य दाखवलं. यावेळी तिच्या आणि बिबट्यामधील थरार पाहायला मिळाला.

या बिबट्याने तरुणीचा थेट गळा धरला. तेव्हा तिने कळशीने बिबट्याचे डोकं फोडले. कळशी डोक्यावर मारुन तिने बिबट्यापासून स्वत:ची सुटका केली. या तरुणीच्या धाडसाने तिने पुढे आलेला मृत्यू परतविला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड येथे ही घटना घडली. बिबट्यासोबतच्या या झटापटीत वृषाली जखमी झाली असून तिला सध्या उपचारासाठी यवतमाळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

वृषाली नीलकंठ ठाकरे ही पुसदला फार्मसीचे शिक्षण घेत आहे. तसेच, ती अधूनमधून शेतात घरी कामाला सुद्धा कुटुंबाला मदत करत असते.

पुण्यात हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

पुण्यातील हडपसरमध्ये पहाटे बिबट्याचं दर्शन झालं. यावेळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर या बिबट्याने हल्ला केला. हडपसर येथील गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे ही घटना घडली. संभाजी आटोळे असं या तरुणाचं नाव आहे ज्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला आहे.

संभाजी आटोळे हा गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉककरिता गेला होता. तेवढ्यात तिथे एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या पायाला आणि गालाला बिबट्याचे पंजे लागले. त्यात कतो जखमी झाला. सध्या संभाजी आटोळेंना ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या :

शहरभर बिबट्याचा वावर; इगतपुरीकरांची पाचावर धारण

Video: बिबट्याचा घोरपडीवर लपून हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ