Zadipatti Theater Festival : झाडीपट्टी  नाट्य संमेलन ब्रम्हपुरीमध्ये रंगणार, 17 व 18 सप्टेंबरला आयोजन, नाट्य कलावंत व रसिकांना उत्सुकता

| Updated on: Aug 06, 2022 | 5:58 PM

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वी त्याला झाडीमंडळ नावाने ओळखले जायचे. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली झाडीबोली या नावाने प्रचलित आहे.

Zadipatti Theater Festival : झाडीपट्टी  नाट्य संमेलन ब्रम्हपुरीमध्ये रंगणार, 17 व 18 सप्टेंबरला आयोजन, नाट्य कलावंत व रसिकांना उत्सुकता
झाडीपट्टी अखिल नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध वनकर 
Follow us on

नागपूर :  अखिल झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाच्या वतीने येत्या 17 व 18 सप्टेंबरला ब्रम्हपुरी येथे झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे (Zadipatti Theater Association) आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकतीच वडसा देसाईगंज येथे  अखिल झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे सर्व सदस्य, नाट्यनिर्माता संघटेनचे पदाधिकारी, कलावंत संघटनेचे पदाधिकारी, डेकोरेशन संघटनेचे पदधिकारी,  वादक संघटेनचे पदाधिकारी  यांची सभा झाली. ब्रम्हपुरी (Bramhapuri)येथे  झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरले. बैठीकीत  झाडीपट्टी अखिल नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेते, गायक, लेखक व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर  यांची निवड करण्यात आली आहे. अखिल झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाच्या (Akhil Zadipatti Theater Development Board)  बैठकीत अनिरुद्ध वनकर यांच्या  नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

विविध समित्यांचे गठन

संमेलनाच्या व्यवस्थापनासाठी मुख्य समिती, स्वागत समिती, स्टेज  व्यवस्थापन समिती, भोजन समिती, निवास समिती, स्वागत समिती, स्टेज  व्यवस्थापन समिती, भोजन समिती, निवास समिती, नाटक समिती, सांस्कृतिक संगीत समिती,  पुरस्कार निवड समिती, प्रसिद्धी व प्रचार समिती, महिला व्यवस्थापन समिती, आर्थिक जमापुंजी समिती व विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.  झाडीपट्टी नाट्य संमेलन मुख्य समितीमध्ये अनिरुद्ध वनकर, हिरालाल सहारे (पेंटर), अनिल उट्टलवार, परमानंद गहाने, प्रल्हाद मेश्राम, शेखर पटले, प्रा. शेखर डोंगरे, भास्कर पिंपळे, मुस्ताक शेख, किरपाल सयाम, नित्यानंद बुद्धे, अंबादास कांबळी, संदीप राऊत, सचिन कवासे, सपना मोटघरे, संजय रामटेके  यांची निवड करण्यात आली.  या नाट्य संमेलनात काय काय कार्यक्रम असतील याची उत्सुकता नाट्य रसिकांना आहे.

गेल्या 150 वर्षांपासून नाटकाचे सादरीकरण

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वी त्याला झाडीमंडळ नावाने ओळखले जायचे. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली झाडीबोली या नावाने प्रचलित आहे. या भागात गेल्या 150 वर्षांपासून लोककलावंत नाटक हा कलाप्रकार सादर करत आहेत. दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की, इथल्या नाटकांना प्रारंभ होतो. विदर्भात शहरीकरणाचे वारे वाहू लागले असले तरी इथल्या नाट्यसंस्कृतीने आपली प्राचीन परंपरा जपली आहे. वैदर्भीय शेतकऱ्याचे नाटकावर  फार प्रेम आहे. बऱ्याच कालावधीनंतर संमेलन होत असल्याने  झाडीपट्टी  नाट्य संमेलनामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. नाट्यकलावंत व रसिकांमध्ये  उत्सुकता निर्माण झाली आहे. या संमेलनामुळे देशात झाडीपट्टीची आणखी एक वेगळी ओळख निर्माण होईल, अशी अपेक्षा झाडीपट्टी अखिल  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा