Bhandara Biogas : भंडाऱ्यातील तुमसर, मोहाडी तालुक्यात बायोगॅसचा यशस्वी प्रयोग, सिलिंडरच्या वाढत्या किमतीवर बायोगॅसचा उत्तम पर्याय

तेजस मोहतुरे

| Edited By: |

Updated on: Aug 05, 2022 | 11:15 PM

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बायोगॅसचा प्रकल्प उभारला. महागाईच्या काळात या बायोगॅसने सिंलिडरवर मात केली आहे. विदेशातील मेक्सिकोमधील बायोगॅस तंत्रज्ञान (Biogas Technology) आता महाराष्ट्रात यशस्वी झालाय. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी-तुमसर (Mohadi and Tumsar) तालुक्यात बायोगॅसचा यशस्वी प्रयोग सुरु आहे. बायोगॅस प्रकल्प म्हणजे मोठा खड्डा. सिंमेटचे बांधकाम अवजड पाईप असे आपल्याला माहिती […]

Bhandara Biogas : भंडाऱ्यातील तुमसर, मोहाडी तालुक्यात बायोगॅसचा यशस्वी प्रयोग, सिलिंडरच्या वाढत्या किमतीवर बायोगॅसचा उत्तम पर्याय
सिलिंडरच्या वाढत्या किमतीवर बायोगॅसचा उत्तम पर्याय

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बायोगॅसचा प्रकल्प उभारला. महागाईच्या काळात या बायोगॅसने सिंलिडरवर मात केली आहे. विदेशातील मेक्सिकोमधील बायोगॅस तंत्रज्ञान (Biogas Technology) आता महाराष्ट्रात यशस्वी झालाय. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी-तुमसर (Mohadi and Tumsar) तालुक्यात बायोगॅसचा यशस्वी प्रयोग सुरु आहे. बायोगॅस प्रकल्प म्हणजे मोठा खड्डा. सिंमेटचे बांधकाम अवजड पाईप असे आपल्याला माहिती आहे. हे सर्व आता जुने झाले. आता प्लास्टिकच्या फुगाच्या सहाय्याने बायोगॅस प्रकल्प उभारता येत असल्याचे तंत्रज्ञान आले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी या तालुक्यातील गावामध्ये शेतकऱ्यांनी बायोगॅसचा यशस्वी प्रयोग सुरू झालाय. मेक्सिकोमधील बायोगॅस तंत्रज्ञान आता महाराष्ट्र, गुजरात उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग करून दाखिवले आहे. सध्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बायोगॅसचा प्रकल्प उभारलाय.

2 हजारांहून अधिक कुटुंबांना कनेक्शन

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधन महत्त्वाची भूमिका बजावते आहे. त्यातच जनावरांचे शेण मोठ्या प्रमाणात मिळते. हे लक्षात घेऊन तुमसर व मोहाडी येथे 2 हजारहून अधिक कुटुंबांनी बायोगॅस कनेक्शनचे घेतले आहे. इन्फोसिस कंपनीच्या CSR फंड आणि सिस्टीमा कंपनीची तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून युवा रूरल असोसिएशन लाभधारकांना बायोगॅस प्रकल्प पूर्णपणे मोफत देत आहे. गोबर गॅस प्लांट शेतकरी कुटुंबांसाठी फायदेशीर ठरत आहे. असं रुरल असोसिएशन गोबर गॅस प्रोजेक्टचे शैलेश साउसाखरे यांनी सांगितलं.

25 किलो शेणापासून 5 किलो गॅस

गोबर गॅस प्लांटमधून तयार होणाऱ्या गॅसने या कुटुंबांत स्टोव्ह जळतो. या कुटुंबातील महिला केवळ एक वेळच नव्हे तर दुपारचे आणि रात्रीचे जेवणही बनवत आहेत. याशिवाय टाकाऊ शेणही शेतात खत म्हणून वापरले जात आहे. घरातील तीन ते चार जनावरांच्या सुमारे 25 किलो शेणातून एका दिवसात सुमारे पाच ते सहा किलो गॅस तयार होतो. या वायूपासून दिवसभराचे अन्न तयार केले जाते. प्लांटमधून निघणारा वायू थेट किचनमध्ये पाईपद्वारे पुरवला जातो. आता LPG गॅस सिलेंडरची किंमत 1100 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ही योजना लोकांसाठी वरदान ठरत आहे. असं लाभार्थी वनिता खोब्रागडे व शोभा गिरेपुंजे यांनी सांगितलं. एकीकडं गगनाला भिडत असलेल्या गॅसच्या किमती दुसरीकडं वाढती महागाई यामुळे सामान्य मानसाची आर्थिक गोची होत चालली आहे. अशावेळी बायोगॅस प्रकल्प नक्कीच महागाईच्या जाचातून सुटका देणारा ठरेल, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI