AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला, मुलींना उचलून नेतात, अत्याचारांमुळे पाकिस्तान सोडून भारतात आलो – पाकिस्तानी नागरिकांनी मांडली कैफियत

भारतात राहणारे पाकिस्तानी हा मुद्दा चर्चेत आला असून जळगावध्येही अनेक पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे. लाँग टर्म व्हिसा घेऊन ते भारतात रहात आहेत. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. तिथे कशी परिस्थिती हती, भीती वाटायची असे सांगत अनेक नागरिकांनी आपबिती कथन केली.

महिला, मुलींना उचलून नेतात, अत्याचारांमुळे पाकिस्तान सोडून भारतात आलो - पाकिस्तानी नागरिकांनी मांडली कैफियत
आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व द्या..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2025 | 9:28 AM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतलादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला. पर्यटनाचा, सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या लोकांना दहशतवाद्यांवनी त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यादेखत गोळ्या झाडून ठार केलं. या हल्ल्यानंत संपूर्ण देशात क्रोधाचं , संतापाचं वातावरण असून दहशतवाद्यांची नांगी ठेता, त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानालही धडा शिकवा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं ुचलंत पाकिस्तानची कोंडी करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. सिंधू कराराला स्थगिती, भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

48 तासांत पाकिस्तांनी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले असून अनेक जण पाकिस्तानात परतत आहेत. भारतात राहणारे पाकिस्तानी हा मुद्दा चर्चेत आला असून जळगावध्येही अनेक पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे. लाँग टर्म व्हिसा घेऊन ते भारतात रहात आहेत. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व मिळावं, अशी त्यांची मागणी असून कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे. पाकिस्तानात घडणाऱ्या घटना, अत्याचार, वाटणारी भीती या सर्वांना कंटाळून अनेक पाकिस्तानी नागिरकांनी भारतात येऊन स्थायिक राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील अनेक महिलांनी त्यांची कैफियत मांडली आहे.

रोजच्या जगण्याचा संघर्ष

आम्ही पाकिस्तानाता 50 वर्ष राहिलोय, आता दोन वर्षांपासून इथे भारतात, जळगावात येऊन राहतोय. तिकडे परिस्थिती ठीक नव्हती, गॅस नाही, पाणी, लाईट नाही, काहीच नव्हतं , खूप त्रास व्हायचा. त्याउप्पर म्हणजे तिथे राहताना भीती वाटायची. तिथे आम्ही कामधंदा करायचो, पण संध्याकाळी 5 वाजता दुकान बंद करायचो, घाबरून घाबरू रहायचो, असा अनुभव एका गृहस्थांनी सांगितला.

रोजच्या अत्याचाराला कंटाळून आम्ही पाकिस्तान सोडलं

आम्ही जळगावात 3-4 वर्षांपासून राहतोय. तिथे( पाकिस्तान) वातावरण खूप खराब होतं, बाहेर पडणं देखील मुश्कील होतं , खूप भीती वाटायची असं एका महिलेने सांगितलं. पण इथे चांगलं वाटतं असं एका महिलेने सांगितलं.

महिला मुली पाकिस्तानात सुरक्षित नाहीत , बाहेर फिरणं तर सोडाच दिवसभर घराबाहेर पडता येत नव्हतं, मुलांना मुलींना उचलून घेऊन जातात, अशा दडपणाखाली भीतीने पाकिस्तानात जगत होतो असं आणखी एका महिलेने आणि इतर नागरिकांनी बोलताना सांगितलं. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचे नागरिकत्व द्यावं, आमचे नातेवाईक तसे कुटुंब जे पाकिस्तानात आहे त्यांना सुद्धा भारतात घेऊन यावं, अशी मागणीही अनेक कुटुंबांनी केली आहे

चार ते पाच दिवसांपूर्वीच आमचे कुटुंबीय नूरी व्हिजा घेऊन पाकिस्तानात गेले, त्यातच पहलगाम येथील घटना घडल्यामुळे ते आता पाकिस्तानात अडकले आहेत, त्यांना पुन्हा भारतात येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या बांधवांनी केली आहे. भारतात आम्ही , आमच्या महिला सुरक्षित आहोत जळगावात राहताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा त्या नरकात (पाकीस्तानात) जायचं नाही , अशा भावना या नागरिकांनी बोलून दाखवल्या.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.