पलाश मुच्छल आता वेगळ्याच अडचणीत, कबुतरांच्या दाणे टाकण्यावरून वाद पेटणार ?
इंडियन महिला क्रिकेटर स्मृती मंधाना हीच्या सोबतच्या पर्सनल नात्यावरुन चर्तेत असलेला चित्रपट निर्माता पलाश मुच्छल आता आणखी एका अडचणीत सापडला आहे.

इंडियन महिला क्रिकेटर स्मृती मंधाना हीच्या सोबतच्या पर्सनल नात्यावरुन चर्तेत असलेला चित्रपट निर्माता पलाश मुच्छल आता आणखी एका अडचणीत सापडला आहे. आता पलाश मुच्छल हा कबुतरांना अन्न दिल्यावरुन चर्चेत आहे. कबुतरांना मोकळ्या जागेत दाणे टाकून लोकांना प्रोत्साहन देणारी पोस्ट केल्याच्या प्रकरणात आता पलाश अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संगितकार आणि निर्माता असलेले पलाश मुच्छ यांचा महिला क्रिकेटर स्मृती मंधाना हीच्या सोबत साखरपुडा ठरला होता. त्याच वेळी स्मृती मंधाना हीच्या वडीलाचे तब्येत बिघडल्याने हा कार्यक्रम पुढे ढकल्याचे आधी जाहीर झाले होते. मात्र, या कार्यक्रमातच पलाश मुच्छल याचे अन्य तरुणीशी संबंध असल्याचे जाहीर झाल्याने हा साखर पुडा तुटला होता.त्यानंतर स्मृती मंधाना हीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन पलाश मुच्छल याच्या सोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले होते.
कबुतरांच्या दाणे टाकण्यावरून वाद पेटणार.. ??
कबुतरांना मोकळ्या जागेत दाणे टाकून प्रोत्साहन देणारी कृती केल्याचा आरोप संगीतकार पलाश मुच्छल याच्यावर आहे. त्यांनी या संदर्भात पोस्ट सोशल मीडियावर टाकून सार्वजनिक जागेत कबुतरांना अन्न देण्याचा चुकीच्या मार्गाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे यांनी करीत BMC आणि मुंबई पोलिसांना कारवाईची मागणी केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार सार्वजनिक आणि मोकळ्या जागेत कबुतरांना खाद्य देण्यास मनाई घातली आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनविकाराचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे निर्देश दिले होते.