Palghar Election Result 2023 | अखेर पालघरमधून आली ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी

Palghar Gram Panchayat Election Result 2023 | राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होतायत. त्यात ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झालीय. ठाकरे गट शेवटच्या स्थानावर आहे. या दरम्यान आता पालघर जिल्ह्यातून ठाकरे गटासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

Palghar Election Result 2023 | अखेर पालघरमधून आली ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी
Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result Uddhav Thackeray Group Shivsena Latest Maharashtra political news in marathi
| Updated on: Nov 06, 2023 | 3:25 PM

पालघर : मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातून ठाकरे गटासाठी चांगली बातमी आहे. कोकणातून ठाकरे गटाची पिछेहाट झालीय. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना आचरा, कुडाळमध्ये नितेश राणे यांनी धक्का दिला. त्याचवेळी महाडमध्ये सुद्धा ठाकरे गटाला मोठा फटका बसलाय. महाडमध्ये ठाकरे गटाला 7 ग्राम पंचायतींवर समाधान मानाव लागलय. भरतशेठ गोगावले यांनी ठाकरे गटाला हा धक्का दिला. पालघरमधून ठाकरे गटासाठी दिलासादायक बातमी आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने बाजी मारली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत 53 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायती निवडून आणल्या आहेत.

पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटात असतानाही शिवसेना शिंदे गटाला केवळ 3 जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसला साधे खातेही उघडता आले नाहीय. जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने 5 तर आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पार्टीने 08 आणि भाजपाने 05 ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

ठाकरे गट सर्वात शेवटच्या स्थानावर

पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखल्याने कार्यकर्त्यांत मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. शिंदे गटावर मात्र त्यांनी खोक्याचा आरोप केला आहे. राज्याच्या ग्राम पंचायतींचा एकूण निकाल लक्षात घेता, ठाकरे गट सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्याखालोखाल अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व आहे.

पालघर जिल्हा फायनल आकडेवारी

पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व

पालघर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

एकूण ग्रामपंचायत -53

भाजप – 06

शिंदे गट – 03

अजित पवार गट – 00

उद्धव ठाकरे गट – 12

काँग्रेस -00

शरद पवार गट – 04

इतर – 13

बविआ 05

माकप 08

मनसे -1

एकूण निकाल 52

बहिष्कार टाकलेली ग्रामपंचायत 01

Follow Us