Maharashtra Live Updates | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशा सेविकांना दिवाळीची मोठं गिफ्ट

| Updated on: Nov 07, 2023 | 7:11 AM

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result Live | आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निकालाचे प्रत्येक अपडेट वेगाने तुम्हाला मिळणार आहे. गावाचा कारभारी कोण ठरणार? याची माहिती दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित होणार आहे.

Maharashtra Live Updates | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशा सेविकांना दिवाळीची मोठं गिफ्ट

मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार आहे. दुपारी १२ ते १ दरम्यान राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 74 टक्के मतदान रविवारी झाले होते. अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. शिवसेना-भाजपसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. अनेक बड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपला सक्रीय सहभाग दाखवला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील यासह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शिवसेनेतील कोणता गट आणि राष्ट्रवादीतील कोणता गट वरचढ ठरणार आहे? हे ही या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. निकालचे सर्व अपडेट तुम्हीला टीव्ही ९ मराठीवर मिळणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 06 Nov 2023 10:15 PM (IST)

  नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब सरकारला धारेवर धरले

  काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी कडब्याच्या मुद्द्यावरून पंजाब सरकारला धारेवर धरले आहे. सिद्धू म्हणाले की, हे तेच सरकार आहे जे एकेकाळी शेतकऱ्यांना एकरी 5 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे बोलले होते. शेतकऱ्यांचा दोष नसून सरकार या प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.

 • 06 Nov 2023 10:00 PM (IST)

  मुंबईत दिवाळीत फक्त 3 तास फटाके उडवणार, हायकोर्टाने निश्चित केली वेळ

  हवेच्या गुणवत्तेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि बीएमसीला फटकारले आहे. शुक्रवारपर्यंत AQI सुधारला नाही तर चार दिवस बांधकामावर बंदी घालण्यात येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर दिवाळीत फटाके फोडण्याची वेळ सायंकाळी 7 ते रात्री 10 अशी निश्चित करण्यात आली आहे.

 • 06 Nov 2023 09:42 PM (IST)

  जम्मू-काश्मीर: रस्ता अपघातात 4 पोलीस जखमी

  दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मोहिपोरा भागात अपघात झाल्याने चार पोलिस जखमी झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेनंतर जखमी पोलिसांना कुलगाम जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

 • 06 Nov 2023 09:02 PM (IST)

  आशा सेविकांना दिवाळी भाऊबीज भेटमध्ये 20 टक्के वाढ

  मुंबई : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा सेविकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी भाऊबीज भेट मध्ये 20% अशी भरघोस वाढ करुन त्यांना रुपये 6,000  इतकी रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी दिली.

 • 06 Nov 2023 08:29 PM (IST)

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवला

  मिरज : ऊस दरासंदर्भात मिरज तालुक्यातील आरग येथील साखर कारखान्यावर उसाचा भरलेला ट्रक जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवला. यामध्ये ट्रॅक्टर आणि ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 • 06 Nov 2023 08:18 PM (IST)

  बोरीवली येथून 505 ग्रॅम चरससह दोन आरोपींना अटक

  मुंबई : बोरिवली MHB पोलिसांनी 505 ग्रॅम चरससह दोन आरोपींना अटक केली आहे. या चरसची किंमत सुमारे आठ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपक अक्षयबरनाथ सिंग (29 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. एक्सर मेट्रो स्थानकाजवळ एक आरोपी चरस विकण्यासाठी जात असल्याची माहिती MHB पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

 • 06 Nov 2023 07:53 PM (IST)

  ३२ वर्ष लढा दिला, अखेर सरपंच झालेच

  अहमदनगर : अरणगावचे नूतन सरपंच पोपट पुंड यांना तब्बल 32 वर्षांनी सरपंच पद मिळाल आहे. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी पहिली निवडणूक लढली. मात्र, पदरी निराशाच पडली. त्यानंतर तब्बल 32 वर्षे त्यांना अपयश आले. मात्र, आज वयाच्या 51 वर्षी ते सरपंच झाले. त्यांची निवड झाल्यावर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

 • 06 Nov 2023 07:40 PM (IST)

  ड्रग्ज माफिया ललित पाटीलची मैत्रीण मनोरुग्ण..? वकिलांचा कोर्टात दावा

  पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याची मैत्रीण आणि पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. वकिलांनी तशी माहिती शिवाजीनगर न्यायालयात दिली. त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र वकिलांनी न्यायालयात सादर केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

 • 06 Nov 2023 07:38 PM (IST)

  शिवसेनेने भाजपाला सोडले, हिंदुत्वाला नाही - उद्धव ठाकरे

  शिवसेनेने भाजपाला सोडले, हिंदूत्वाला नाही. भाजपाचे हिंदूत्व आम्हाला पटत नाही. आमचे हिंदुत्व घंटा बडवणारे नाही. भाजपाने काही हिंदुत्वाचे पेटंट घेतलेले नाही असे वक्तव्य शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी येथे केले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

 • 06 Nov 2023 07:29 PM (IST)

  प्रबोधनकारक हवेसे वाटतात, पण पेलवत नाहीत - उद्धव ठाकरे

  प्रबोधनकारांना काही मिळवायचं नव्हत आणि काही हरण्यासारखं त्यांच्याकडे नव्हते. परंतू त्यांना ढोंग दिसले की त्यावर ते प्रहार करायचे असे वक्तव्य शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमात केले.

 • 06 Nov 2023 07:07 PM (IST)

  भुजबळांची वक्तव्ये अतिशय बेजबाबदारपणाची आणि निषेधार्ह - संजीव भोर पाटील यांची टीका

  जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विनंतीवरून दोन निवृत्त न्यायाधीश उपोषण स्थळी जात असतील आणि जरांगे यांना त्यांच्या मागण्यांबाबतच्या कायदेशीर मर्यादा आणि अडचणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर यात गैर काय आहे? न्यायाधीशांच्या या उपस्थितीबाबत राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी टीका टिप्पणी करणे हे अतिशय बेजबाबदारपणाचे आणि निषेधार्ह असल्याचे शिवसेना प्रवक्ता संजीव भोर पाटील यांनी म्हटले आहे

 • 06 Nov 2023 06:30 PM (IST)

  छगन भुजबळ मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत- महेश डोंगरे

  छगन भुजबळांनी संविधानाची शपथ घेवून जातीत तेढ निर्माण करण्याच काम करू नये. छगन भुजबळ मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत. छगन भुजबळ तुमची गाठ मराठ्यांशी आहे जाहीर धमकी देतोय, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे.

 • 06 Nov 2023 06:15 PM (IST)

  चिंतामण वनगा खासदार असल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यात अपयश

  शिंदे गट आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मूळ गावातील कवाडा ग्रामपंचायतवर माकपचे निर्विवाद वर्चस्व कायम. सरपंचपदी माकपच्या दर्शना बोधले विजयी, चिंतामण वनगा खासदार असल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यात अपयश

 • 06 Nov 2023 06:00 PM (IST)

  शहापूर मधील गेगाव ग्रामपंचायतीवर तीन पक्षाचा दावा, सरपंच कोणत्या पक्षाचा?

  शहापूर मधील गेगाव ग्रामपंचायतीवर तीन पक्षाचा दावा, भाजप, उद्धव ठाकरे गट आणि अजित पवार गट तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आणि सदस्य तिन्ही पक्षाच्या कार्यालयात जावून तिन्ही पक्षाचे चिन्हाचे पट्टे टाकल्याने दावा केलाय. आता नेमका हा सरपंच कोणत्या पक्षाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 • 06 Nov 2023 05:45 PM (IST)

  महाराष्ट्र विधानसभा शतकपुर्ती समारोहाला द्रोपर्दी मुर्मू राहणार उपस्थित

  आज मी आणि नीलमताई गोर्हे यांनी राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा १०२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने शतकपुर्ती समारोह आयोजित करण्यात आला आहे. याचं निमंत्रण महामहीम राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांना दिल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

 • 06 Nov 2023 05:32 PM (IST)

  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा होणार आगामी निवडणूकांना फायदा- अविनाश थोरात

  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात फायदा होणार असे, राजकीय विश्लेषक अविनाश थोरात यांनी म्हटले आहे.

 • 06 Nov 2023 05:29 PM (IST)

  छगन भुजबळ यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना केला सवाल

  छगन भुजबळ यांनी नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका केलीये. फडणवीसांना अरे तुरे करता गुहमंत्र्यांना म्हणता तुम्ही या तुम्हाला संरक्षण देतो. जाळपोळ करणारे तुमची लोक नाहीत सत्ताधा-यांची आहेत, असं सांगता मग गुन्हे मागे घ्या असं का सांगता, असा सवाल थेट जरांगे पाटील यांना भुजबळांनी विचारला आहे.

 • 06 Nov 2023 05:21 PM (IST)

  तलासरी तालुक्यातील कवाडे ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा सीपीएमचा सरपंच

  पालघर जिल्ह्यात चर्चेत असलेल्या तलासरी तालुक्यातील कवाडे ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा सिपीएमचा लाल सलाम. शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का . श्रीनिवास वनगा यांचे मूळगाव असलेल्या कवाडे ग्रामपंचायत मध्ये सीपीएमचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी .

 • 06 Nov 2023 05:08 PM (IST)

  आजचा ग्रामपंचायत निकाल अजितदादांना मुख्यमंत्री ठरविणारा- सचिन खरात

  आज महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला अत्यंत चांगल्या जागा मिळाल्याचे दिसत आहे. आदरणीय अजितदादा महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्याचा कसा विकास होईल हे सातत्याने पाहत आहेत याचमुळे आदरणीय अजितदादा पवार यांची राज्यामध्ये विकासपुरुष म्हणून ओळख आहे त्यामुळे आजचा जर निकाल पाहिला तर राज्यातील जनतेने विकासाला महत्त्व दिले, असे  सचिन खरात यांनी म्हटले आहे.

 • 06 Nov 2023 04:50 PM (IST)

  सातारा जिल्हातील निकाल खालीलप्रमाणे

  अजित पवार गट - 36, शिंदे गट - 37, शरद पवार गट - 24, उद्धव ठाकरे गट -, भाजप - 41, काँग्रेस -4, इतर -4. आज निकाल/78, बिनविरोध /68, एकुण /146

 • 06 Nov 2023 04:40 PM (IST)

  भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्वात मोठा पक्ष 

  भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  25 ग्रामपंचायतवर विजय मिळवला आहे. शिवसेना दोन्ही गटाचे खाते उघडले नाही. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी 57 ग्रामपंचायतचा निकाल निकाल घोषित झाला. यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आला.

 • 06 Nov 2023 04:33 PM (IST)

  Grampanchayat Election Result | 'या' तालुक्यात भाजपाने एकही जागा नाही जिंकली

  नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गटालाही इथे चांगलाच धक्का बसला असून या दोन्ही गटाला मागे टाकत काँग्रेसने तीन जागांवर बाजी मारली आहे तर मनसेने दोन जागांवर खाते उघडले आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे इतर सर्व पक्षांना मागे टाकत चार अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले आहेत.

  निवडून आलेले सरपंच -

  1 ओंडली - प्रकाश वाळू खडके - शिंदे गट

  2 दौडत - पांडू मामा शिंदे - काँग्रेस

  3 कृष्ण नगर - वैशाली सचिन आंबावणे - अपक्ष

  4 कुशेगाव- एकनाथ गुलाब कातोरे - अपक्ष

  5 मोगरे - प्रताब विठ्ठल जाखेरे - मनसे

  6 लक्ष्मी नगर - सावित्री सोमनाथ जोशी - ठाकरे गट

  7 घोटी खुर्द - माणिक निवृत्ती बिन्नर - काँग्रेस (पोट निवडणूक)

  8 आडवंन - निकिता किशोर आघान - काँग्रेस

  9 धारगाव - रेश्मा पांडुरंग पुंजरा - अपक्ष

  10 नागोसली - काशिनाथ साखरू होले - शिंदे गट

  11 उंबरकोन - आत्मराम नामदेव सारुकते - अपक्ष

  12 सोमज - जिजाबाई काशिनाथ कुंदे - मनसे

  13 टाकी घोटी - माधुरी आडोळे - ठाकरे गट

  14 शिरसाठे - सुनीता दत्तू सदगीर - शरद पवार गट

  15 मोडाळे - शिल्पा दत्तू आहेर - अजित पवार गट

  16 नांदगाव सदो - अनिता राक्षे - ठाकरे गट (बिनविरोध)

 • 06 Nov 2023 04:29 PM (IST)

  Khalapur Election Result | खालापूर तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीची निकाल

  शिंदेगट 6

  ठाकरे गट 5

  अजित पवार गट 5 '

  भाजप 3

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 1

  काँग्रेस 1

  स्थानिक आघाडी 1

  असे थेट सरपंच पदाचे उमेदवार हे निवडून आले आहेत

 • 06 Nov 2023 03:33 PM (IST)

  Satara Election Result | साताऱ्यात 146 ग्रामपंचायतीचा निकाल काय?

  बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सरपंच - 68

  आज निकाल - 78

  एकूण - 146

  अजित पवार गट - 33

  शिंदे गट - 35

  शरद पवार गट - 19

  उद्धव ठाकरे गट -

  भाजप - 35

  काँग्रेस -4

  इतर -4

 • 06 Nov 2023 03:00 PM (IST)

  Katewadi Election Result | काटेवाडीचा गड अजित पवारांनी राखला

  काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात.

  अजित पवार पुरस्कृत जय भवानी माता पॕनलचा विजय.

  काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव.

  काटेवाडीत भाजपने उभ केलं होतं अजित पवारांच्या विरोधात पॅनल.

  बारामतीतील काटेवाडीकडे होतं महाराष्ट्राचे लक्ष.

 • 06 Nov 2023 02:57 PM (IST)

  Shriwardhan Grampanchayat Election Result | श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाचा दणदणीत विजय

  श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात 38 जागांपैकी 34 ग्रामपंचायती अजित पवार गटाला. 1 शिंदे गटाला, तर 1 ठाकरे गटाला, तर 2 स्थानिक आघाडीला. अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच वर्चस्व कायम.

 • 06 Nov 2023 02:49 PM (IST)

  Ahmednagar Grampanchayat Election Result | अहमदनगर दक्षिण 75 ग्रामपंचायत मतमोजणी निकाल

  नगर दक्षिणेत भाजपचे वर्चस्व, महायुतीला सर्वाधिक जागा, महायुतीला 51 जागा.

  भाजप - 29

  राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 20

  राष्ट्रवादी (शरद पवार गट ) - 7

  शिवसेना (शिंदे गट) - 2

  शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - 2

  मनसे - 2

  काँग्रेस -1

  स्थानिक आघाडी -11

 • 06 Nov 2023 02:45 PM (IST)

  Beed grampanchayat election Result | भाजप आमदार नमिता मुंदडा यांना धक्का

  बीडमधील नेकनूर ग्रामपंचायत अजित पवार गटाच्या ताब्यात.

  जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेकनूरची ओळख.

  संपूर्ण पॅनलवर अजित पवार गटाचे वर्चस्व.

  भाजप आमदार नमिता मुंदडा यांना धक्का.

  मंत्री धनंजय मुंडे गटाची सरशी.

 • 06 Nov 2023 02:29 PM (IST)

  Ahmednagar Grampanchayat Election Result | अहमदनगरच्या अकोलेमध्येही अजित पवार गट सरस

  अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सर्व 21 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर.

  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वाधिक जागा.

  अजित पवार गटाला 10 जागा, भाजपला 7 जागा तर शरद पवार गटाला अवघ्या 2 जागा. अपक्ष 2 जागेवर विजय.

  अजित पवार गटाचे अकोलेचे डॉ.किरण लहामटे यांच्या पॅनलला सर्वाधिक जागा..

 • 06 Nov 2023 02:25 PM (IST)

  Nashik Grampanchayat Election Result | शरद पवार गटाला मोठा धक्का

  - नाशिक जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का

  - 48 पैकी फक्त 5 सरपंचाच्या जागा शरद पवार गटाला

  - तर अजित दादांची जिल्ह्यात दादागिरी वाढली

  - अजित पवार गटाला 11 जागा

  - शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात अजित दादांची मुसंडी

  - छगन भुजबळांनी राखला येवलाचा गड

  - येवला मधील दोनही सरपंचाच्या जागा भुजबळ समर्थकांकडे

 • 06 Nov 2023 01:59 PM (IST)

  Mahad Grampanchayat election Result | भरत गोगावले यांचं वर्चस्व कायम

  महाड या विधानसभा क्षेत्रात शिंदेंच्या शिवसेनेला 41 जागा मिळाल्या आहेत.

  अजित पवार गटाला 5, ठाकरे गटाला 7, शेकापला 3, ग्राम विकास आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत.

  महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच वर्चस्व कायम

 • 06 Nov 2023 01:56 PM (IST)

  Satara Election Result | सातारा ग्रामपंचायतीचे आतापर्यंतचे निकाल

  बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सरपंच - 68

  आज निकाल - 78

  एकूण - 146

  अजित पवार गट - 22

  शिंदे गट - 35

  शरद पवार गट - 19

  उद्धव ठाकरे गट -

  भाजप - 35

  काँग्रेस -4

  इतर - 4

  इतर - 07

 • 06 Nov 2023 01:47 PM (IST)

  Sangli Election Result | सांगली ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काय?

  सांगतील जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाणून घ्या.

  मतदान झालेल्या ग्रामपंचायती 97

  लागलेले निकाल

  भाजप - 31

  शिंदे गट - 07

  ठाकरे गट -

  अजित गट - 02

  शरद पवार गट - 17

  काँग्रेस - 5

  मनसे - 01

  इतर - 07

 • 06 Nov 2023 01:32 PM (IST)

  Pune Bhor Election Result | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचा निकाल काय?

  पुणे जिल्ह्यातील भोर तालुका ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे.

  एकूण ग्रामपंचायत - 27

  काँग्रेस - 22

  राष्ट्रवादी अजित पवार - 01

  राष्ट्रवादी शरद पवार - 02

  शिवसेना ठाकरे - 01

  रिक्त - 01 फॉर्म बाद झाल्यान जागा रिक्त

  27 पैकी 14 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या तर 13 ग्राम पंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात आली. भोरमध्ये काँग्रेस आमदार आमदार संग्राम थोपटे यांचं वर्चस्व कायम.

 • 06 Nov 2023 01:27 PM (IST)

  Raver Election Result | रावेरमध्ये रक्षा खडसेंकडून एकनाथ खडसे यांना धक्का

  रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या रावेर येथे 13 पैकी सात ग्रामपंचायतीवर भाजाने वर्चस्व कायम ठेवलं आहे. एक प्रकारे भाजपाच्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनाच हा धक्का दिला आहे

 • 06 Nov 2023 01:02 PM (IST)

  Sangli grampanchayat Election | शिराळा तालुक्याचा निकाल काय?

  शिराळा तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतचे निकाल हाती.

  भाजपच्या सत्यजित देशमुख, महाडिक बंधु गटाकडे एकूण 12 ग्रामपंचायतची सत्ता

  शरद पवार गटाचे आमदार मानसिंगराव नाईक गटाकडे 11 गामपंचायतीची सत्ता

  तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडे 1 ग्रामपंचायतची सत्ता

 • 06 Nov 2023 01:00 PM (IST)

  Palghar Election Result | पालघर जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का

  पालघर जिल्ह्यात अजित पवार गटाचा सुपडा साफ. पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसचा सुपडा साफ. ग्रामपंचायत निवडणुकीत या दोन्ही पक्षाला एकही जागा नाही.

 • 06 Nov 2023 12:46 PM (IST)

  Roha Grampanchayat election | रायगड रोहा तालुक्यात काय स्थिती?

  रायगड रोहा तालुक्यात अजित पवार गटाचे वर्चस्व.

  सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात 12 पैकी 7 जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सरपंच

  स्थानिक विकास आघाडीला एक, शिंदे, उबाठा, आणि शेकाप, शरद पवार गट प्रत्येकी एक सरपंच

 • 06 Nov 2023 12:45 PM (IST)

  Baramati Grampanchayat election | बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे किती सरपंच?

  बारामती तालुक्यात भाजपचा दुसरा सरपंच विजयी.

  बारामती तालुक्यातील पारवडी येथे भाजपचा सरपंच विजयी

  बारामती तालुक्यात आत्तापर्यंत 26 पैकी 24 जागी राष्ट्रवादीचा सरपंच तर 2 जागी भाजपचा सरपंच

 • 06 Nov 2023 12:28 PM (IST)

  Shahada election Result | नंदूरबारच्या शहादा तालुक्यात काय घडलं?

  शहादा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतच्या मतमोजणी पूर्ण झाली असून, शहादा तालुक्यात भाजपाच्या वर्चस्व राहिला आहे तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. 16 पैकी भाजपाला 9 ग्रामपंचायतीत यश मिळालं आहे तर 7 जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. शहादा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र अनेक प्रस्थापितांना धक्का देत अपक्षांनी मोठी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.

 • 06 Nov 2023 12:22 PM (IST)

  Sindhudurg election Result | सिंधुदुर्गात राणेंचा करिश्मा

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लागलेल्या निकालात भाजपची सरशी झाली आहे. जिल्ह्यात राणेंचा करिश्मा कायम असून पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. विजयी उमेदवार आमदार नितेश राणेंना भेटण्यासाठी कणकवली येथील राणेंच्या निवासस्थानी आले. आमदारांनी विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन. कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

 • 06 Nov 2023 11:50 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | सातारा पाटणचा निकाल काय ?

  - 10 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

  - 10 पैकी 6 ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व.

  - 2 राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे.

  - 1 राष्ट्रीय काँग्रेस

  - 1 स्थानिक आघाडी

 • 06 Nov 2023 11:48 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | जळगावात शिंदे गट सरस

  जळगावमधील 34 पैकी 21 गावात शिंदे गटाची सत्ता. ग्रामीण भागात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचं वर्चस्व

 • 06 Nov 2023 11:45 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | विखे-पाटील गटाला धक्का

  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे. वाकडी ग्रामपंचायतीत सत्तांत्तर. विखे पाटील गटाचा पराभव. भाजपचे विवेक कोल्हे गटाचा विजय. सरपंचपदी रोहिणी बाळासाहेब आहेर विजयी. गणेश कारखाना निवडणुकीच्या पराभवानंतर वाकडी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का.

 • 06 Nov 2023 11:32 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | इगतपुरी ग्रामपंचायत, एकूण 16 पैकी 7 निकाल हाती

  इगतपुरी ग्रामपंचायतीचे आतापर्यंतचे निकाल जाणून घ्या.

  शिंदे गट - 1

  ठाकरे गट - 1

  अजित पवार गट -

  शरद पवार गट -

  काँग्रेस - 2

  मनसे - 1

  अपक्ष - 2

 • 06 Nov 2023 11:30 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | बारामतीमध्ये फक्त आणि फक्त अजित पवार

  - बारामती तालुक्यातील मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण

  - तीन फेऱ्यांमध्ये एकूण 18 गावाचा निकाल हाती

  - सर्व 18 गावांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक हाती सत्ता

 • 06 Nov 2023 11:29 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | धाराशिव जिल्ह्यातील पहिला निकाल हाती

  - धाराशिव जिल्ह्यातील पहिला निकाल हाती.

  - परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायत मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हाती.

  - खासगाव ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा ताबा, सरपंच पदासह 7 पैकी 4 जागा जिंकल्या

  - अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

  - भाजापाच्या पूजा राजेश म्हात्रे सरपंच म्हणून विजयी

 • 06 Nov 2023 11:22 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | संगमनेरचा निकाल काय?

  संगमनेर तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय. विखे पाटील गटाची सत्ता. सरपंचपदी नितीन म्हतारबा आहेर विजयी. यापूर्वी होती उद्धव ठाकरे गटाची सत्ता.

 • 06 Nov 2023 11:20 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | रोहित पवार यांना धक्का

  कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का. कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर कुंभेफळ आणि खेड गावात भाजपचा सरपंच, तर आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा कर्मनवाडी येथे विजय.

 • 06 Nov 2023 11:19 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | सिंधुदुर्गात वैभव नाईक यांना धक्का

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार वैभव नाईक यांना धक्का. आचरा ग्रामपंचायत भाजपाकडे. कुडाळ वालावलमध्ये भाजपाची सत्ता.

 • 06 Nov 2023 11:16 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | सांगलीत दोन गटात जोरदार वादावादी

  - सांगलीत ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गटात जोरदार वादावादी.

  - एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार.

  - जुना राजवाडा येथील मतमोजणी केंद्राबाहेर घडला प्रकार.

 • 06 Nov 2023 11:08 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | मनसेने पहिली ग्राम पंचायत जिंकली

  - नाशिक जिल्ह्यात मनसेने उघडले खाते.

  - जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा.

  - संगीता कैलास गायकवाड 558 मते मिळाली. थेट सरपंचपदी विजय.

  - विरोधी उमेदवार शिवसेना ठाकरे गटाच्या सीमा भाऊसाहेब पागेरे यांना मिळाली 394 मते.

 • 06 Nov 2023 11:03 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | ग्राम पंचायत निकालात भाजपा नंबर 1

  ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने सर्वाधिक 121 ग्राम पंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. त्याखालोखाल दादा गटाने 94 ग्राम पंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.

 • 06 Nov 2023 10:58 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | चिराई ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

  नाशिक जिल्ह्यातील चिराई ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता. सरपंचपदी शकुंतला पाटील विजयी. चिराई माता प्रगती पॅनलने मारली बाजी.

 • 06 Nov 2023 10:52 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | मुरबाडचा पहिला निकाल हाती

  मुरबाडमध्ये पहिला सरपंच शिंदे गटाचा. कुडवली ग्रामपंचायतीमधून मालती दीपक हरड विजयी. भाजप व शिंदे गटात होती लढत.

 • 06 Nov 2023 10:48 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | चाळीसगाव ग्रामपंचायतीचा निकाल काय?

  चाळीसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे वर्चस्व कायम.

  - खेरडे-सोनगाव तसेच रामनगर ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

  - या दोघेही ग्रामपंचायतिंवर लोकनियुक्त सरपंचासह भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत.

 • 06 Nov 2023 10:42 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | बारामतीमध्ये फक्त अजित पवार

  बारामतीमधील 8 ग्रामपंचायतींपैकी 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाच वर्चस्व. अजित पवार गटाची सत्ता.

 • 06 Nov 2023 10:39 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात भाजपला धक्का

  श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचा निकाल हाती. काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी. जिल्ह्यातील दोन निकाल हाती, एक काँग्रेसकडे तर एकावर शरद पवार गटाचा विजय. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला धक्का.

 • 06 Nov 2023 10:37 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निकालास सुरुवात

  आटपाडी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता तर एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता. वाक्षेवाडी, आंबेवाडी भाजपकडे तर विभूतवाडी ग्रामपंचायत शिंदे गटाकडे तर मासाळवाडी मध्ये स्थानिक आघाडी विजयी

 • 06 Nov 2023 10:34 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | नाशिकमधील ग्रामपंचायतीचा पहिला निकाल हाती

  - नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा

  - अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे सरपंच पदावर विजयी

 • 06 Nov 2023 10:30 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | भाजपा-दादा गटामध्ये चुरस

  ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा आणि अजित पवार गटामध्ये चुरस आहे. भाजपाने सर्वाधिक 88 आणि अजित पवार गटाने 81 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

 • 06 Nov 2023 10:27 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | अहमदनगरमध्ये सरपंच पदाचा पहिला निकाल हाती

  अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाचा पहिला निकाल हाती. श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उघडले खाते. अजित लकडे जनतेतून सरपंचपदी विराजमान

 • 06 Nov 2023 10:16 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | बारामतीमध्ये अजित पवार गटाची सत्ता

  बारामती तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सत्ता. भोंडवे वाडी म्हसोबा नगर पवाइमाळ या तिन्ही ग्राम पंचायतींमध्ये अजित पवार गटाची सत्ता

 • 06 Nov 2023 10:14 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | सांगतील भाजपाने उघडलं खातं

  सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने खात उघडलं आहे. मिरज तालुक्यातील हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता कायम. खासदार संजय काका पाटील गटाचे अरविंद तांबवेकर यांची हरिपूर ग्रामपंचायतीवर सत्ता कायम.

 • 06 Nov 2023 10:10 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | ग्रामपंचायत निकालात महायुती भारी

  ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एकूण 2359 ग्राम पंचायती आहेत. महायुतीने आतापर्यंत 210 तर महाविकास आघाडीने 81 ग्राम पंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

  दादा गट - 78

  भाजपा - 75

  शिंदे गट - 58

  ठाकरे गट - 28

  काँग्रेस - 27

  पवार गट - 26

 • 06 Nov 2023 10:06 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | आमदार बबन शिंदे गटाला मोठा धक्का

  पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर. अभिजीत पाटील गटाचे दिपक शिंदे विजयी. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे गटाला मोठा धक्का. विठ्ठलचे माजी संचालक मोहन कोळेकर गटाला मोठा धक्का.

 • 06 Nov 2023 09:55 AM (IST)

  Gram Panchayat Election Result : कराडमधील येणपे ग्रामपंचायत काँग्रसकडे

  कराडमधील येणपे ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. चव्हाण आणि उंडाळकर गटाला सत्ता राखण्यात यश आले आहे. दक्षिण सोलापूरमधील दोड्डी ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली आहे.  दोड्डी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 • 06 Nov 2023 09:43 AM (IST)

  Gram Panchayat Election Result : महायुतीचा आतापर्यंत 199 ग्रामपंचायतींवर विजय

  आतापर्यंत महायुतीचा 199 ग्रामपंचायतींवर विजय झाला आहे. भाजप आणि अजीत पवार गटामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा आतापर्यंत 69 ग्रामपंचायतीवर विजय झाला आहे.

 • 06 Nov 2023 09:36 AM (IST)

  Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणूक निकालात अजीत पवार गट सर्वात पुढे

  ग्रामपंचायत निवडणूक निकालात अजीत पवार गट सर्वात पुढे आहे. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळायला सुरूपात झाली आहे. अजीत पवार गटाच्या पाठोपाठ भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालासंदर्भात हे सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे.

 • 06 Nov 2023 09:25 AM (IST)

  Gram Panchayat Election Result : सीमा खोत चांदेकरवाडीच्या सरपंचपदी

  सीमा खोत यांची चांदेकरवाडीच्या सरपंचपदी निवड करण्यात आलेली आहे. कोल्हापूरात ठाकरे गटाने खाते उघडले आहे. सोलापूरमधील दोन ग्रामपंचायती या भाजपाकडे आहे.

 • 06 Nov 2023 09:20 AM (IST)

  Gram Panchayat Election Result : ठाकरे गटाचेही खाते उघडले

  राधानरगरीमधील चांदेकरवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. तर, करवीरमध्ये शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला आहे.

 • 06 Nov 2023 09:13 AM (IST)

  Grampanchayat Election Result : नाशिकच्या 48 गावातील ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी

  नाशिकच्या 48 गावातील ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होणार आहे. नाशिकमधील 4 ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहे. पुण्याच्या खेड तालूक्यात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

 • 06 Nov 2023 09:11 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | शिंदे गटाने खात उघडलं

  ग्राम पंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल हाती आला आहे. शिंदे गटाने विजयी शुभारंभ केला आहे. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी ग्राम पंचायत शिंदे गटाकडे केली आहे.

 • 06 Nov 2023 09:08 AM (IST)

  Grampanchayat Election Result : पुणे जिल्ह्याच्या मतमोजणीला लवकरच सुरूवात होणार

  पुणे जिल्ह्याच्या मतमोजणीला लवकरच सुरूवात होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या 231 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी सुरू होणार आहे. तर दुररीकडे नागपूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. पहिला कल हाती येणार आहे.

 • 06 Nov 2023 08:58 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | नागपूर जिल्ह्यातील 361 ग्राम पंचायतींचे निकाल

  नागपूर जिल्ह्यातील 361 ग्राम पंचायतींचे निकाल लागणार आहेत. मतमोजणीला काही वेळात होणार सुरुवात. 1224 मतदार केंद्रांवर जवळपास 85 टक्के मतदान झालं. सरपंचपदासाठी 1186 उमेदवार मैदानात होते, तर सदस्य पदासाठी 6882 उमेदवार निवडणूक मैदानात होते.

 • 06 Nov 2023 08:30 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | आज हवेलीत मतदान

  हवेली तालुक्यात आज 3 ग्रामपंचायत आणि 10 पोटनिवडणुकीसाठी मतदान. हवेलीत अशोक बापू पवार आणि भाजपचे प्रदीप कंद यांची प्रतिष्ठा पणाला. मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.

 • 06 Nov 2023 08:15 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | सांगली, धुळे, कोल्हापुरात किती वाजता सुरु होणार मतमोजणी?

  - सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे.

  - धुळ्यात 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात. धुळे, शिंदखेडा ,साखरी ,शिरपूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार.

  - कोल्हापूर जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायती आणि अकरा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात.

  - करवीर तालुक्यातील 13 गावांची मतमोजणी कोल्हापुरातील शासकीय गोदाम परिसरात पार पडणार.

 • 06 Nov 2023 08:07 AM (IST)

  Gram Panchayat Election Result | बिनविरोध निकाल लागलेल्या ग्राम पंचायतींमध्ये कोण सरस?

  राज्यात एकूण 2359 ग्राम पंचायती आहेत. त्यात 293 ग्राम पंचायतींचे निकाल बिनविरोध लागले आहेत.

  भाजपा - 66

  शिंदे गट - 55

  ठाकरे गट - 25

  काँग्रेस - 20

  पवार गट - 20

  दादा गट - 69

  महायुतीकडे 190 ग्राम पंचायती आहेत, महाविकास आघाडीकडे 65 ग्राम पंचायती आल्या आहेत.

 • 06 Nov 2023 08:00 AM (IST)

  Raigad district Gram Panchayat | चंद्रपूर जिल्ह्यात निकालाची उत्सुकता

  रायगड जिल्ह्यात अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुनीत तटकरे, भरत गोगावले, अनंत गीते, जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला आहे. जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

 • 06 Nov 2023 07:55 AM (IST)

  Chandrapur district Gram Panchayat | चंद्रपूर जिल्ह्यात निकालाची उत्सुकता

  चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सकाळी 10 पासून सुरुवात होईल. 4 ग्रामपंचायतींची मतमोजणी राजुरा तहसील कार्यालयात होणार आहे. वरोरा तहसील कार्यालयात 2 ग्रामपंचायतींची मतमोजणी तर ब्रह्मपुरी आणि सावली या ठिकाणी एक- एक ग्रामपंचायतची मतमोजणी होणार आहे.

 • 06 Nov 2023 07:43 AM (IST)

  pune district Gram Panchayat | पुणे जिल्ह्यात सकाळी दहा वाजता मतमोजणी

  उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. अनेक उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. मतदाराने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.

 • 06 Nov 2023 07:27 AM (IST)

  Gram Panchayat Election Updates | पुणे जिल्ह्यात 49 सरपंचांची निवड बिनविरोध

  पुणे जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज येणार आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यात 49 सरपंचांची निवड बिनविरोध झाली आहे. तसेच 800 च्या आसपास सदस्यांच्या बिनविरोध निवड झाली आहे.

  बिनविरोध सरपंच

  • महायुती - 24
  • मविआ - 16
  • स्थानिक आघाडी -9

  बिनविरोध सदस्य

  • महायुती - 485
  • मविआ - 335
  • इतर - 129
 • 06 Nov 2023 07:20 AM (IST)

  Gram Panchayat Election Updates | मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात

  राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. या सर्व ग्रामपंचयतींसाठी आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.

Published On - Nov 06,2023 7:14 AM

Follow us
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.