AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: टीममध्ये निवड, मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधीची प्रतिक्षा कायम, 7 वर्षांनंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार?

India vs South Africa Womens T20i Series 2026 : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 5 टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे.हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे.

IND vs SA: टीममध्ये निवड, मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधीची प्रतिक्षा कायम, 7 वर्षांनंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार?
Bharti FulmaliImage Credit source: Getty
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 25, 2026 | 4:43 AM
Share

वुमन्स टीम इंडिया आयपीएलच्या 19 व्या मोसमादरम्यान (Ipl 2026) दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वुमन्स टीम इंडिया या दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 24 मार्च रोजी भारतीय संघाची घोषणा केली. या 15 सदस्यीय भारतीय संघात भारती फुलमाळी हीला संधी देण्यात आली. भारती शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2019 साली खेळली होती. त्यामुळे भारतीची गेल्या 7 वर्षांपासून प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनिमित्ताने भारतीची ही प्रतिक्षा संपणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीची क्रिकेट कारकीर्द

भारतीने 2019 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. भारतीने इंग्लंड विरुद्ध टी 20i सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. भारतीला इंग्लंड विरुद्ध या मालिकेत 2 टी 20i सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतर भारतीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेशाची प्रतिक्षा आहे.

भारतीला त्यानंतर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अनेक वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. भारतीला काही आठवड्यांआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. मात्र भारतीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीला 7 वर्षांनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमथ्ये संधी मिळते का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भारतीची आंतरराष्ट्रीय आणि टी 20 कारकीर्द

भारतीने टीम इंडियासाठी 2टी 20 सामन्यांमध्ये 23 धावा केल्या आहेत. तसेच भारतीने डब्ल्यूपीएल स्पर्धेत एकूण 3 सामने खेळले आहेत. भारतीने या 3 सामन्यांमध्ये 64 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका वुमन्स टीम काय करतेय?

दरम्यान दक्षिण आफ्रिका वुमन्स क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे.  उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका न्यूझीलंडने जिंकली आहे. न्यूझीलंड या सीरिजमध्ये 3-1 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.  तर मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा बुधवारी 25 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेचा शेवटच विजयाने करणार का? याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे.   त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात  3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. ही मालिका 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे.

वुमन्स टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

दरम्यान वुमन्स क्रिकेट टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची काही आठवड्यांपूर्वी सांगता झाली. टीम इंडियाने 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 फरकाने जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. तर ऑस्ट्रेलियाने एकमेव कसोटी सामनाही जिंकला होता.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट