AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : इंडिया आयपीएल दरम्यान खेळणार टी 20i मालिका, टीम जाहीर, पहिला सामना कधी?

India Women Squad For T20i Series Against South Africa : टीम इंडिया एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली.

Team India : इंडिया आयपीएल दरम्यान खेळणार टी 20i मालिका, टीम जाहीर, पहिला सामना कधी?
Ipl BcciImage Credit source: Tv9 Telugu
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 24, 2026 | 10:05 AM
Share

अवघ्या काही दिवसांनी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सुरुवात होणार आहे. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाची सर्व लगबग सुरु आहे. या दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी 24 मार्च रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरुन याबाबतची माहिती दिली आहे. निवड समितीने या मालिकेसाठी कुणाचा समावेश केलाय हे जाणून घेऊयात.

1 मालिका, 5 सामने आणि 15 खेळाडू

वुमन्स टीम इंडिया आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार सुरु असताना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि वुमन्स टीम इंडिया यांच्यात 17 ते 27 एप्रिल दरम्यान या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. प्रतिका रावल हीला या टी 20i मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. तर अमरावतीकर भारती फुलमाळी हीचा समावेश करण्यात आला आहे.

5 पैकी 4 सामने एकाच मैदानात

उभयसंघातील 5 पैकी 4 टी 20i सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.उभयसंघातील टी 20i मालिकेतील पहिले 2 सामने हे डरबनमध्ये होणार आहेत. त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना हा जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर पाचवा आणि अंतिम सामना 27 एप्रिलला बेनोनीमधील विलोमूर पार्क क्रिकेट स्टेडियम खेळवण्यात येणार आहे.

दोघींची पहिल्यांदाच निवड

दरम्यान निवड समितीने टी 20i संघात पहिल्यांदाच 2 भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे. काश्वी गौतम आणि अनुष्का शर्मा या दोघींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघींना टी 20i पदार्पणाची प्रतिक्षा असणार आहे.

महिला ब्रिगेडचा दक्षिण आफ्रिका दौरा 2026

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी, श्रेयांका पाटील, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, उमा चेत्री (विकेटकीपर) आणि अनुष्का शर्मा.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?