AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci Naman Awards 2026 : शुबमन-स्मृतीचा सन्मान, बीसीसीआयकडून सर्वात मोठा पुरस्कार, खेळाडूंना पुरस्कारासह काय मिळालं?

Shubman Gill and Smriti Mandhana Bcci Naman Awards 2026 Winners : भारतीय क्रिकेटपटू आणि चाहत्यांसाठी रविवार 15 मार्च हा दिवस खास ठरला. भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजी माजी खेळाडूंचा बीसीसीआयच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Bcci Naman Awards 2026 : शुबमन-स्मृतीचा सन्मान, बीसीसीआयकडून सर्वात मोठा पुरस्कार, खेळाडूंना पुरस्कारासह काय मिळालं?
Shubman Gill and Smriti Mandhana Bcci Naman Awards 2026 WinnersImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 15, 2026 | 11:01 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आयसीसीच्या गेल्या काही स्पर्धेत मेन्स आणि वुमन्स टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अंडर 19 मेन्स आणि वुमन्स टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. मेन्स टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तर हरमनप्रीत कौर हीच्या कॅप्टन्सीत भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय. त्यामुळे टीम इंडियाचाच क्रिकेट वर्तुळात बोलबाला पाहायला मिळत आहे. अशात आता टीम इंडियासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयकडून नमन पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं आहे.

शुबमन-स्मृतीचा सन्मान

बीसीसीआयकडून मेन्स वनडे आणि टेस्ट टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याला सन्मानित करण्यात आलं आहे. तर महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीचाही सत्कार करण्यात आला आहे. शुबमनला सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर स्मृतीला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारने गौरवण्यात आलं. या दोघांनाही 2024-2025 या मोसमातील कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये या भव्यदिव्य कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं.

स्मृती-शुबमनची कामगिरी

स्मृती मंधाना हीने गेल्या मोसमात 1800 धावा केल्या होत्या. तर शुबमन गिल याने नेतृत्वाच्या जबाबदारीसह 1 हजार 565 धावा केल्या होत्या. या कामगिरीसाठी स्मृती आणि शुबमनला हा मोठा पुरस्कार देण्यात आला. बीसीसीआयकडून या दोघांना ट्रॉफीसह प्रत्येकी 15 लाख रुपये देण्यात आले.

प्रिन्सचा सन्मान

सर्व खेळाडूंना मेडल

बीसीसीआयच्या या विशेष कार्यक्रमात अंडर 19 वर्ल्ड कप विजेता मेन्स आणि वुमन्स टीम इंडियातील खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच टी 20i वर्ल्ड कप विजेता टीम इंडियातील खेळाडूंनीही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. बीसीसीआयकडून या सर्व खेळाडूंना मेडलने सन्मानित करण्यात आलं.

तिघांना जीवनगौरव पुरस्कार

तसेच बीसीसीआयकडून रॉजर बिन्नी,राहुल द्रविड आणि मिताली राज या भारताच्या 3 माजी खेळाडूंना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल