‘माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार’ पंजाबराव डख यांनी खरंच जाहीर माफी मागितली का? त्यांनीच केला खुलासा
राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यासाठी मोठी मदतप्रणाली कामाला लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातून पावसाने दडी मारली होती. शेतकऱ्यांनी पिक पेरणी करुन ठेवली होती. पाण्याअभावी पिकं करपून जात होती. त्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.

राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर हवामान तज्ज्ञ म्हणून भरोसा टाकला. त्यांनीच आता राज्यात दुष्काळ पडणार असल्याचं मान्य केलं आहे. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यात प्रसिद्ध असणारे पंजाबराव डख यांच्या नावाने सोशल मीडियावरुन एका पोस्ट व्हायरल होत होती. यंदा राज्यात दुष्काळ पडणार आहे, असं डख यांनी सांगितल्याचा दावा यातून करण्यात आला होता. एवढच नाही तर त्यांनी आपण 2026मध्ये सांगितलेले सगळे अंदाज चुकल्याबद्दल माफीही मागितल्याचेही सांगितले जात होते. आता याच व्हायरल पोस्टबाबत त्यांनी खुलासा केलाय.
राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यासाठी मोठी मदतप्रणाली कामाला लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातून पावसाने दडी मारली होती. शेतकऱ्यांनी पिक पेरणी करुन ठेवली होती. पाण्याअभावी पिकं करपून जात होती. त्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.
राज्यात पावसाळा सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांसह इतरही नागरिक हवामान विभागाच्या आणि इतरही हवामान तज्ज्ञांच्या अंदाजांवर लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या भरवशावर राहून आपले शेतीचे नियोजन करण्यात येते. कधकधी तर स्वतः राज्य सरकारही याबाबत आवाहन करताना दिसून येते. पण यंदा शेतकरी राजावर खूपच वाईट वेळ येऊन ठेपलेली पाहायला मिळाली. मुख्यमंत्री राज्यात दौरा करताना दिसून आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांची अवस्था सांगताना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले होते.
दरम्यान, पंजाबराव डख यांच्या नावाने पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत होती. “साहेब तुमच्या भरवश्यावर राहून आख्खा महाराष्ट्र आडवा झाला पावसाचा 1 थेंब पडला नाही आणि तुम्ही तारखावर तारखा देत राहिले आता बास करा, असा जळजळीत प्रहार एका शेतकऱ्याने त्यांच्यावर कमेंटमधून केला होता.
तर दुसऱ्या एकाने असं लिहिलं होतं की “पहिले पासून सगळे न्यूजवाले सांगत होते की, यावर्षी पाऊस कमी येणार आहे पण तुम्ही प्रत्येकवेळी आज पाऊस येणार, उद्या येणार, इकडे वादळ फिरले, तिकडून कमी दाबाचा पट्टा तयार झाला असं सांगत होता. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी 50 हजार रुपये खर्च केले आहे. तुम्ही हेच दोन महिन्यांपूर्वी सांगायला हवं होतं, कमीत कमी खताचे पैसे तरी वाचले असते.” दरम्यान आता ती पोस्ट माझी नाही. माझ्या नावाने ती पोस्ट व्हायरल होत आहे, असा खुलासा त्यांनी केलाय.