पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज: 4-5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट

Panjabrao Dakh Maharashtra Rain forecast Latest Marathi News : महाराष्ट्राच्या कोणत्या भागात किती पाऊस पडणार? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे. काही भागात रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. वाचा सविस्तर...

पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज: 4-5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट
पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 24, 2024 | 6:16 PM

सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. अशात काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. पण पुढे काही दिवसात महाराष्ट्रात कसा पाऊस पडेल? कोणत्या भागात किती पाऊस पडण्याचा अंदाज आहे? याबाबत हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा रेड, तर काही भागात ऑरेंज आणि काही ठिकाणी यलो अलर्ट असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

सध्या वातारण कसं आहे?

अरबी समुद्रात उत्तरेत नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकला आहे. त्यामुळे राज्यभर मान्सून सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट पाऊस होऊ शकतो. तसंच हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख यांचा अंदाज काय?

पुढचे पाच दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पुढचे 4 ते 5 दिवस कोकणासह मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस असेल. विदर्भात हलक्या आणि मध्यम सरींचा पाऊस पुढचे पाच दिवस राहणार आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांचा आहे.

कोणत्या भागात कोणता अलर्ट?

सध्या राज्यातील सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यातील काही भागात जास्त पावसाची शक्यता आहे. पावसाचा अंदाज पाहता पंजाबराव डख यांनी अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. वरचे चार जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.