Rain Update : 25, 26, 27, 28, 29 जूनला पावसाचे तांडव, नद्या, ओढे तुडूंब भरणार, पंजाबराव डख यांचा पावसाचा नवा अंदाज आला!

तकऱ्यांनी घाबरू नये. पाऊस टप्प्याटप्प्यात पडेल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा एक टप्पा राहील. त्यानंतर जुलै महिन्यात 10 जुलै ते 15 जुलै या काळात पावसाचा एक टप्पा असेल. पण 10 जुलैपर्यंत सगळ्या पेरण्या पूर्ण होतील, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

Rain Update : 25, 26, 27, 28, 29 जूनला पावसाचे तांडव, नद्या, ओढे तुडूंब भरणार, पंजाबराव डख यांचा पावसाचा नवा अंदाज आला!
panjabrao dakh rain update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2026 | 9:21 PM

Punjabrao Dakh Monsoon Update : राज्यात पाऊस कसा असेल, हवामान कसे असेल याची माहिती पंजाबराव डख हे देतात. त्यांनी पुढच्या काही दिवसात तसेच जुलै महिन्यात पाऊस कसा असेल याबाबत सांगितले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार 24 जून रोजीपासून पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे. जवळपास दहा जुलैपर्यंत राज्यात सगळीकडे पाऊस होणार आहे. 10 जुलैपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार आहेत.

कोणत्या भागात कसा पाऊस असेल?

शेतकऱ्यांनी घाबरू नये. पाऊस टप्प्याटप्प्यात पडेल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा एक टप्पा राहील. त्यानंतर जुलै महिन्यात 10 जुलै ते 15 जुलै या काळात पावसाचा एक टप्पा असेल. पण 10 जुलैपर्यंत सगळ्या पेरण्या पूर्ण होतील. 25 ते 30 जून या काळात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे मोठा पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रातही ओढे, नाले वाहतील असा पाऊस होईल, असे भाकित पंजाबराव डख यांनी केले आहे.

यंदा धरणं भरणार का?

ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही, तिथे आजपासून पावसाला सुरुवात होईल. तुमच्या भागात आज पाऊस झालेला असेल तर लगेच दोन दिवसांनी तुमच्याकडे पाऊस येईल. मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की, आमच्याकडे पाळीव प्राणी आहेत. पशुधन आहेत, त्यामुळे आमच्या तळ्यात पाण येईल का? अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छीतो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल. 24 ते 30 जुलैच्या दरम्यान मुंबई, पुणे या भागात मुसळधार पाऊस पडेल. कोकणातही या काळात पाऊस असेल. पुण्यात जास्त पाऊस झाल्याने उजणी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात होईल. उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असेल. त्यामुळे निळवंडे धरण, संगमनेरची दोन-चार छोट्या धरणातही पाण्याची आवक होईल, असे सांगून आगामी काळात धरणं भरतील असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

3 नोव्हेंबर रोजी थंडी येण्यास सुरुवात

राज्यात पाऊस कधी ओसरेल तसेच थंडी कधीपासून चालू होईल, याचेही त्यांनी भाकित केले आहे. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात चांगला पाऊस असेल. ऑगस्ट महिन्यात दोन मोठे पाऊस पडतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस पडेल. 13 नोव्हेंबर रोजी थंडी येईल. दोन ते 3 नोव्हेंबर रोजी थंडी येण्यास सुरुवात होईल. दोन जुलै ते 20 जुलैच्या काळात काही भागात चांगला पाऊस होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

Follow Us