पंकजा मुंडेंचा दुष्काळ दौरा, शेतकरी भावुक, फोडला टाहो
महाराष्ट्रात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाहीये, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्र्यांचा दुष्काळ पहाणी दौरा सुरू आहे. याच दरम्यान ही घटना घडली आहे.

महाराष्ट्रात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाहीये, पावसाभावी पिकं वाळून गेली. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीच पिकली नाही तर आता जगायचं कसं असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे. दरम्यान संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 265 तालुक्यांचा समावेश हा दुष्काळ क्षेत्रात करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिंधीचे दुष्काळ दौरे सुरू आहेत. आज जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या दुष्काळ दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने टाहो फोडल्याचं पहायला मिळालं. यावेळी पंकजा मुंडे यांनी संबंधित शेतकऱ्याला धीर देत पाणी पाजलं.
राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जालन्याच्या पालकमंत्री पकंजा मुंडे यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहाणी सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी आज बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव आणि गेवराई शिवारात सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी पंकजा मुंडे सोयाबीनच्या शेतामध्ये दाखल होताच कडेगाव येथील दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांना पंकजा मुंडे यांच्या समोरच रडू कोसळलं, त्यावेळी पंकजा मुंडे यांनी या शेतकऱ्याला धीर देत पाणी पाजलं. राज्यात पावसाभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी पिकांचा देखील कोणताही भरोसा नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
राज्यात दुष्काळ जाहीर
यंदा राज्यात पावसाभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान आता सरकारकडून दुष्काळी भागातील जनतेसाठी विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना मोफत अन्न धान्य वाटप, विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ, तसेच जनावरांसाठी चारा वाटप, अशा विविध योजना राबवण्यात येणार आहेत.