जमावबंदीचे नियम तोडून गर्दी जमविल्याचा आरोप, शशिकांत गित्ते यांना न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी

शशिकांत गित्ते यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जमावबंदीचे नियम तोडून गर्दी जमविल्याचा आरोप, शशिकांत गित्ते यांना न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 8:46 PM

बीड : परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवार बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. भडकलेल्या गित्ते समर्थकांनी जमावबंदीचे नियम तोडून गर्दी गित्ते यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. जमावबंदीचे नियम तोडून गर्दी जमविल्याचा आरोपाखाली गुरुवारी रात्री शशिकांत गित्ते यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Parali Shashikant Gitte remanded in police custody for three days)

उर्मिला  गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी गित्ते यांच्या कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. जमाव बंदीचे आदेश झुगारुन गर्दी केल्यामुळे गित्ते यांच्यावर कारवाई चा बडगा उगारण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि शशिकांत गित्ते यांच्यात बचाबाची झाली. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतल्यावर दोन रिव्हॉल्वर तसंच जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे आढळून आली होती. आरोपी शशिकांत गित्ते याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

परळी पंचायत समिती सभापती म्हणून उर्मिला शशिकांत गित्ते या काम पाहत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला. यामुळे गित्ते समर्थक चांगलेच भडकलेले होते. चिडलेल्या गित्ते समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करायला सुरुवात केली. अखेर जमावबंदीचे नियम तोडून गर्दी केल्याप्रकरणी शशिकांत गित्ते यांना परळी पोलिसांनी अटक केली आहे.

घटनाक्रम काय काय?

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवार बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला. अविश्वास ठरावाच्या वेळी सभापती गित्ते या गैरहजर होत्या.

पंचायत समितीच्या 11 पैकी 10 सदस्य हजर होते. तर उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने 10 हजर सदस्यांनी सभापती विरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उभे करुन मतदान केल्याने सभापतीविरोधात ठराव मंजूर झाला.

ठराव मंजूर झाल्यानंतर डकलेल्या गित्ते समर्थकांनी जमावबंदीचे नियम तोडून गर्दी गित्ते यांच्या निवासस्थानाबेहर गर्दी केली. यानंतर गुरुवारी रात्री शशिकांत गित्ते यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

परळीत मुंडे vs मुंडे, लेटर वॉरचा भडका

गित्ते विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राज्यभरात सुरु होती. कारण, भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं गुरुवारी सांगण्यात आलं. पण, ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय. तसं प्रसिद्धी पत्रकच भाजपनं जारी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.

(Parali Shashikant Gitte remanded in police custody for three days)

संबंधित बातम्या

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.