AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत मुंडे Vs मुंडे, लेटर वॉरचा भडका

भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलं. त्यावर आता भाजपनंही एक प्रसिद्धी पत्रक काढून ते सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा केला आहे.

परळीत मुंडे Vs मुंडे, लेटर वॉरचा भडका
पंकजा मुंडे
| Updated on: Jan 08, 2021 | 9:09 AM
Share

बीड: पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राज्यभरात सुरु होती. कारण, भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं गुरुवारी सांगण्यात आलं. पण, ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय. तसं प्रसिद्धी पत्रकच भाजपनं जारी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे. (BJP’s press release that 3 BJP members have not joined the NCP)

पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलं. त्यावर आता भाजपनंही एक प्रसिद्धी पत्रक काढून ते सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा केला आहे. तसंच त्या सदस्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या देत राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केल्याचा आरोप भाजपनं केलाय.

भाजपचे तिनही सदस्य अधिकृत चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असं पत्रक काढून राष्ट्रवादी काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे पंचायत समिती सदस्य असलेले भरत सोनावणे, मुरलीधर साळवे आणि मोहन आचार्य यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आपला विश्वास आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचं म्हटलंय.

उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी दुपारी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. याप्रसंगी भाजपच्या सदस्यांनी चक्क राष्ट्रवादीला मदत केली.  परळी पंचायत समिती सभापती म्हणून उर्मिला शशिकांत गित्ते या काम पाहत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला.

बबन गित्तेंना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी पंचायत समिती सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. तरीही बबन गित्ते यांच्या घरासमोर दीडशे ते दोनशे कार्यकर्त्ये जमा झाले होते. तेव्हा पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी गित्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2 गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतूस आणि लाठ्या-काठ्यासह अन्य धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

परळीत भाजप शुन्यावर! पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधील राजकीय वैर वाढणार?

परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास

BJP’s press release that 3 BJP members have not joined the NCP

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.