परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास

परळीच्या पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास

बीड : परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. गित्ते यांच्याविरोधात चक्क भाजप सदस्यांनी राष्ट्रवादीला मदत केली. आज (गुरुवार) परळी तहसील कार्यालयात अविश्वास ठरावावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.  (No Confidence motion Against parali panchayat Samiti Chairman Urmila Gitte)

अविश्वास ठरावाच्या वेळी सभापती गित्ते या गैरहजर होत्या. यावेळी चक्क भाजप सदस्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. तसंच यानिमित्ताने मुंडे भाऊ-बहिणींमधील दुरावा कडवटपणा दूर होत असल्याची चर्चा होत आहे.

परळी पंचायत समिती सदस्यांनी सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरुध्द जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुशंगाने आज परळी तहसील कार्यालयात पंचायत समिती सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीला पंचायत समिती 11 पैकी 10 सदस्य हजर होते तर उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने 10 हजर सदस्यांनी सभापती विरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उभे करुन मतदान केल्याने सभापतीविरोधात ठराव मंजूर झाला आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तहसील व शहरात मोठा पोलिस फाटा तैनात होता.

मुंडे भावंडांतील राजकीय कडवटपणा दूर?

एरवी कट्टर राजकीय विरोधक म्हणून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राज्यातील राजकारणात परिचित आहेत. 12 डिसेंबर रोजी बंधू धनंजय मुंडे यांनी राजकीय कडवटपणा चालेल पण घरात सुसंवाद हवा, असं सूचक वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याला धरुन आज पंचायत समिती ठरावावर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे बहिण भावंडातील राजकीय कडवटपणा दूर होतोय की काय अशा चर्चेला परळीच्या नाक्यानाक्यावर सुरुवात झाली आहे.

(No Confidence motion Against parali panchayat Samiti Chairman Urmila Gitte)

हे ही वाचा

हातकणंगले पंचायत समिती सभापतींच्याविरोधात अविश्वास ठराव, काय होणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI