परळीत धनंजय मुंडेंचा पंकजांना धक्का, पंचायत समितीत भाजप शून्यावर!

परळी पंचायत समितीचे भाजपचे तीनही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने भाजपच्या पंचायत समिती सदस्यांची संख्या शून्य झाली आहे.

परळीत धनंजय मुंडेंचा पंकजांना धक्का, पंचायत समितीत भाजप शून्यावर!

बीड : परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिलाय. पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरुद्ध अविश्वास ठरवादरम्यान भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. आता भाजपचे हे तीनही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने भाजपच्या पंचायत समिती सदस्यांची संख्या शून्य झाली आहे. (All three BJP members from Parli Panchayat Samiti join NCP)

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात आज दुपारी (गुरुवार) बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. 12 सदस्यांची संख्या असलेल्या परळी पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. आज यावर मतदान झाले. मतदानावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला.

मुळात 12 सदस्य असलेल्या परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटाचे 8 सदस्यांसह वर्चस्व आहे. त्यातच भाजपचे आणखी 3 सदस्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले असल्याने आता पंचायत समितीच्या कार्यकारिणीत भाजपचे संख्याबळ शून्य झाले आहे. भाजपचा एक सदस्य आधीच अपात्र झाला आहे. त्यामुळे परळीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, सभापती पदावर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर नवीन पदांच्या निवडीसाठी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा आयोजित केली जाण्याचे चिन्ह आहेत. आता ही सभा नेमकी कधी आयोजित करण्यात येतीय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जमावबंदी तोडून गर्दी जमवल्याचा आरोप, शशिकांत गित्ते यांना अटक

परळीच्या राजकारणाने आज दोन मोठ्या घडामोडी बघितल्या. पहिली- पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातला अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि त्यांनी पद गमावलं. त्या भाजपच्या सभापती होत्या आणि त्यांना हटवण्यासाठी राष्ट्रवादीला मदत केली ते काही भाजपच्याच सदस्यांनी…. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना उर्मिला गित्ते यांचे पती शशिकांत गित्ते यांना परळी पोलीसांनी अटक केलीय. जमावबंदी तोडून गर्दी जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठीच त्यांच्यावर कारवाई केली गेलीय. आधी अविश्वास ठराव आणि नंतर पतीला अटक त्यामुळे परळीत तणाव निर्माण झाला.

संबंधित बातम्या

आधी उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं, नंतर पतीला अटक, परळीत तणाव

परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI