Delhi India Alliance Meeting: राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी! इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, कारण…
केंद्र सरकारने दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या अधिवेशनात महिला आरक्षण तसेच मतदारसंघ पुर्नरचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे.

India Aaghadi Meeting: राजधानी दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दिल्लीमध्ये 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचे तर 3 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्या इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला जाणार नसल्याचे समोर आले आहे.
दिल्लीत इंडियाची बैठक, सुप्रिया सुळे गैरहजर राहणार…
केंद्र सरकारने दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या अधिवेशनात महिला आरक्षण तसेच मतदारसंघ पुर्नरचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांची भूमिका या बैठकीमध्ये ठरणार आहे. मात्र या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आजारी असल्याने सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत असं सांगण्यात आले असून पक्षाच्या वतीने इतर खासदर उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे. मात्र पक्षाच्या वतीने इतर खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
डिलिमिटेशनबाबत भाजप शरद पवारांच्या संपर्कात…
दुसरीकडे, संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बहुमताची जुळवाजुळव सुरु केली आहे. याबाबतच सर्वात मोठी अपडेट म्हणजे डिलिमिटेशन बिलसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला जत असल्याची सूत्रांची माहिती आहे. डिलिमिटेशन बिल मांडताना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.