AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या अत्यंत जवळच्या नेत्याचं निधन, पहाटे आला ह्रदयविकाराचा झटका

परतूरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे निष्ठावान नेते सुरेशकुमार जेठलिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. २००९ साली परतूर मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या जेठलियांच्या निधनामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. या दुःखद घटनेने परतूर-मंठा परिसरात शोककळा पसरली आहे.

अजितदादांच्या अत्यंत जवळच्या नेत्याचं निधन, पहाटे आला ह्रदयविकाराचा झटका
| Updated on: May 01, 2026 | 9:17 AM
Share

महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच, शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. दोन वेळा आमदारकी गाजवलेले, अजित पवार यांचे निकटचे असलेल्या शिलेदाराचं निधन झालं आहे. जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आणि परतूरचे माजी आमदार सुरशेकुमार जेथलिया यांचं आज पहाटे निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जेथलिया यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू, म्हणून त्यांची ओळख होती. त्याच्या अकस्मात निधनाने सर्वांनाचा मोठा धक्का बसला असून जिल्हयात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पहाटेच हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेलं पण..

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झालं. सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून 2009 साली नेतृत्व केलं. काँग्रेस पक्षानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात नेलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दरम्यान जेथलिया यांच्या निधनाने परतूर मंठा विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली असून जिल्ह्याच्या राजकीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दोनदा झाले आमदार

जेथलिया यांनी दोन वेळा परतूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं. ते आमदार असताना, त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील अनेक विकासकामं त्यांनी केली. जेथलिया यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही ते अत्यंत लोकप्रिय होते. दिवंगत नेते अजित पवार यांच्याही ते जवळचे होते. जेथलिया यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट