शरद पवार यांचा अपमान केला?, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?, म्हणाले, नरेटीव्ह…

Ajit Pawar on Sharad Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला. अजित पवार या मेळाव्यात काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवार यांचा अपमान केला?, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?, म्हणाले, नरेटीव्ह...
अजित पवार, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 4:19 PM

डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोललं आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही…. अरे मी कसा बोलू देणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. अजित दादाचा वादा आहे. वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळ हवं असेल. या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या, काम कस करून घ्यायचे मी बघतो, असंही अजित पवार म्हणाले.

तर पुन्हा महायुतीला निवडून द्या- अजित पवार

दूध, गॅस, लाडकी बहिण इतर सर्व योजना आहेत. यावर आता 75 हजार कोटी सरकार योजनेवर खर्च करतंय. अजित दादाचा वादा आहे. वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळं हवं असेल. या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या. काम कसं करून घ्यायचे मी बघतो, असा शब्द अजित पवार यांनी दिलाय.

केंद्रात एन डी ए सरकार आहे तसे राज्यात आलं. तर आम्ही काही चर्चा मोदी शाह यांच्याशी केला आहे. केंद्राशी काही योजना बाबत चर्चा झाली आहे. योजना करताना करोडो रुपये लागतात. रिंग रोड,मेट्रो काम अजून करायची आहेत. पुणेकरांनो थोडा त्रास होत आहे. काही काम सुरू आहेत. त्याचा पण कामाला गती देत आहे. आपण वाहतूक कोंडी त्रास होत आहे. पण थोडा दिवस कळ काढा मी कसं करतो बघा. मूलभूत गरजा पूर्ण करू. मी राज्यातील 5 दिवस राज्यात आणि 2 दिवस मुबईमध्ये असेल, आता झोकून देऊन काम करावं लागणार आहे. अल्पसंख्याक लोकाचं मत परिवर्तन करा, असा आदेशही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

पोर्शे कार अपघात प्रकरणावर भाष्य

पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या त्या सर्वा कारवाई केली आहे. अतिक्रमण करून धंदे करणार असेल तर चालणार नाही. गैर प्रकार झाला. नियमावलीत भेदभाव नाही. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरी आमदार सुनील टिंगरे यांची तीन चार चौकशी झाली. पण त्यातून काही समोर आले नाही. त्यामुळे उगाच बदनामी केली जातंय, असं अजित पवारांनी म्हटलं.

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.