मला माफ करा… स्टेट्स ठेवून शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं, चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; पोलिसांची मोठी कारवाई

व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन् शिक्षकाने दोन चिमुकल्यांसोबत संपवलं आयुष्य..., वरिष्ठांवर गंभीर आरोप, चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; पोलिसांची मोठी कारवाई... या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मला माफ करा... स्टेट्स ठेवून शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं, चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; पोलिसांची मोठी कारवाई
Crime
| Updated on: Jul 18, 2026 | 10:58 AM

शिक्षकांवर एक नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी असते आणि प्रत्येक शिक्षक त्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असतो. पण त्या शिक्षकाला काही अडचण येत असेल तर, त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामागे कारण देखील फार मोठं आहे. नुकताच एका 42 वर्षीय शिक्षकाने त्याच्या दोन मुलांसोबत आयुष्य संपवलं आहे. शिक्षकाने कार नदीमध्ये टाकली आणि स्वतःचं मुलांचा देखील अंत केला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. धक्कादायक सत्य म्हणजे शिक्षकाने व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवत आणि वरिष्ठांवर गंभीर आरोप करत स्वतःचा आणि मुलांचा जीवन प्रवास संपवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवून स्वतःच्या दोन मुलांसह एका शिक्षकाने कार नदीत बुडवून आपले जीवन संपविल्याच्या घटनेत शिक्षण विभागातील चौघावर ऍट्रॉसीटीसह विविध कलमान्वये नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सुनील मोरे नावाच्या 42 वर्षीय शिक्षकाने गुरुवारी मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून कार गोदावरीच्या पात्रात टाकली होती.

या घटनेत शिक्षकाच्या दोन मुलासह त्याचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी त्यांनी शिक्षण विभागातील चार जणांची नाव लिहून स्टेट्सला ठेवली होती. मला माफ करा मी मुला बाळांसह आत्महत्या करीत आहेत… असं शिक्षकाने व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटसवर लिहलं होत. त्यावरून नांदेड ग्रामीण पोलिसानी चार जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशीला हे दोघे 2023 ते 2025 साली हदगाव येथील भानेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.

त्यावेळचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांनी प्रशासकीय चौकशी लावली होती. चौकशी दरम्यान गटशिक्षणाधिकारी किशन फोले , विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि मयत सुनील मोरे यांचे सहकारी दत्ता पवळे यांनी मानसिक त्रास दिला होता असा आरोप आहे. त्या त्रासाला कंटाळून सुनील मोरे यांनी जीवन संपविलं अशी तक्रार त्यांचे वडील नारायण मोरे यांनी दिली. त्यावरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि मरणास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us