मोठी बातमी! आंदोलनाला परवानगी नाकारताच जरांगे पाटलांचा प्लॅन बी तयार, टाकला मोठा डाव, सरकारचं टेन्शन वाढलं
अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी आपल्या मुंबईमधील आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली होती. परंतु आता त्यांना या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. जरी सरकारने या आंदोलनासाठी परवानगी नकाराली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या मुंबईमधील आंदोलनावर ठाम आहेत. ते येत्या 15 तारखेला अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत, तर 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मनोज जरांगे पाटील आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.
पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आता पुन्हा एकदा परवानगीसाठी नव्याने अर्ज केला जाणार आहे. ‘जरांगे पाटलांच्या 19 तारखेच्या उपोषणासाठी आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सर्व नियम अटींच्या अधीन राहून आंदोलन करणार, त्यामुळे पुनर्विचार करावा आणि नियम, अटी लागू करून परवानगी द्यावी यासाठी आता नव्याने अर्ज केला जाणार, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान जर पुन्हा आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यास मराठा बांधव याविरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या भूमिकेमुळे सरकारचं टेश्ननं वाढण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटलांनी बोलावली पत्रकार परिषद
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता सोमवारी दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची पत्रकार बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती मंत्र्यांकडून जरांगे पाटील यांना करण्यात आली आहे.