Trending Video : अब्जाधीश मुकेश अंबानी वापरतात हा साधा फोन? Jio IPO च्या मंचावरील नातवासोबतचा व्हिडिओ व्हायरल!
मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. ते काय खातात, काय आवडतं, कोणता फोन वापरतात, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. Jio IPO कार्यक्रमात नातून पृथ्वीसोबत बोलत असताना, त्यांच्या हातात असलेल्या एका फोनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कोणता होता तो फोन ?

सामान्यतः लोकांना असं वाटतं की जे श्रीमंत लोक असतात, ज्यांच्याकडे भरूपर पैसा असतो, ते तर सोन्या-चांदीने मढवलेल्या फोनचा वापर करतात. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले, अब्जाधील मुकेश अंबानी यांची गोष्ट काहीशी वेगळी आहे. Jio IPO च्या मंचावर मुकेश अंबानी यांचा मोबाईल फोनसह एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडिओमध्ये ते आपला मोबाईल फोन नातू पृथ्वी अंबानी याला देताना दिसले. मात्र, काही लोक असा अंदाजही व्यक्त करत आहेत की हा फोन आकाश अंबानी यांचाही असू शकतो. कारण ICC महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान आकाश अंबानी स्टँडमध्ये होते, तेव्हा त्यांच्या हातातही असाच फोन दिसला होता.
मुकेश अंबानी iPhone Air वापरतात का?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @Dr_Priyanka0 या युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी, त्यांचा नातू पृथ्वी अंबानी याला पांढऱ्या रंगाचा iPhone Air देताना दिसले. यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी iPhone Air वापरतात, असा दावा केला जात आहे.
मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे आयोजित करण्यात आलेल्या Jio Platforms च्या मेगा IPO लिस्टिंग सोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होतं. या कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा iPhone Air असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. तोच व्हिडीओ X वर शेअर करताना त्या युजरने लिहीलं, “ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी iPhone Air वापरतात तर…”
Mukesh Ambani is the richest man and still uses an iPhone Air😂
Ambani ji be like Grandson: “Here son, I have got Jio unlimited recharge done! Play PUBG
If Ambani couldn’t protect his children from phones, how can ordinary people protect their children from them? https://t.co/kRdd2fxr4G
— Dr Priyanka (@Dr_Priyanka0) October 28, 2026
आकाश अंबानी यांचा होता हा iPhone Air ?
मात्र काही सोशल मीडिया युजर्स असा दावाही करत आहेत की हा फोन मुकेश अंबानी यांचा नव्हे तर आकाश अंबानी यांचा असू शकतो. कारण, ICC महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान आकाश अंबानी हे स्टँडमध्ये होते, तेवहा तेही पांढऱ्या रंगाचा, एकच कॅमेरा असलेला iPhone Air वापरताना दिसले होते.
IPO लिस्टिंगसारख्या व्यस्त कार्यक्रमांदरम्यान कुटुंबातील सदस्य अनेकदा एकमेकांचे फोन वापरतात किंवा एकमेकांना फोन देतात, असा काही लोकांचा अंदाज आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणारा iPhone Air मुकेश अंबानी यांचा नसून त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांचा असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
( डिस्क्लेमर : हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला आहे. TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. )
