Today Rashi Bhavishya: आज 4 राशींना होणार जबरदस्त फायदा! धन लाभासह मिळणार नशिबाची साथ; वाचा सर्व राशींचे भविष्य
Horoscope Today 29 October 2026: आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तर काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक व्यवहार आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागू शकते. जाणून घ्या आजचा दिवस मेष ते मीन या १२ राशींसाठी कसा असेल.

आज गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026 रोजी करवा चौथचे व्रत पाळले जात आहे. करवा चौथच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती, गणपती आणि करवा मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर गुरुवार हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि धनधान्यात वाढ होते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, आजचा दिवस काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. काहींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात, तर काही राशींच्या व्यक्तींना नाते, आरोग्य आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सावध राहावे लागू शकते. जाणून घेऊया आजचा दिवस मेष ते मीन या 12 राशींच्या व्यक्तींसाठी कसा असेल. मेष सकाळचा वेळ आर्थिक बाबतीत फारसा फायदेशीर ठरणार नाही. मात्र, दिवस जसजसा पुढे जाईल, तसतसे धन लाभाचे योग निर्माण होऊ शकतात. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हलका व्यायाम करा. नोकरीच्या ठिकाणी संवाद कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावू शकते. वृषभ आरोग्य चांगले राहिल. नात्यांमध्ये सुरू असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा. कार्यालयातील कामाचा ताण योग्य पद्धतीने हाताळल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती आजचा दिवस सकारात्मक ठरेल. मिथुन नात्यांमधील मतभेद दूर करण्यावर भर द्या. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. कार्यालयात काम करताना आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. गुंतवणुकीबाबत घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरू शकतात. कर्क प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेले वाद सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, या परिस्थितीतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखा. सिंह प्रेमसंबंधांमध्ये निष्पक्ष भूमिका घ्या. यामुळे नात्यातील समस्या दूर होण्यास मदत होईल. करिअरमध्ये आव्हाने येऊ शकतात. अडचणींवर मात करून चांगली कामगिरी कराल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कन्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वाद निर्माण होऊ शकतील अशा विषयांवर चर्चा करणे टाळा. आरोग्य चांगले राहिल. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांवर मात करून चांगली कामगिरी कराल. तूळ करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी काही नवीन पर्याय उपलब्ध होतील. या संधींचा योग्य विचार करा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. आरोग्य सामान्य राहिल. कामाच्या ठिकाणी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. वृश्चिक आर्थिक नियोजन करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कार्यालयातील जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष द्या. पैशांशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. आरोग्य उत्तम राहिल. धनु शांत राहून काम करण्यावर भर द्या. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱी स्वीकारण्याची संधी मिळेल. यामुळे तुमची व्यावसायिक क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. आरोग्य सामान्यतः चांगले राहिल. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. मकर प्रेमसंबंधांमध्ये सुरू असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी नवीन भूमिका किंवा जबाबदारी मिळू शकते. यामुळे मेहनत आणि क्षमता सिद्ध करता येईल. आर्थिक परिस्थिती अनुकूल राहिल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा विचार करू शकता. कुंभ जोडीदारासाठी अधिक वेळ काढण्याचा प्रयत्न करा. नात्यामध्ये गोडवा वाढेल. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. मात्र, प्रयत्न आणि योग्य नियोजनाच्या मदतीने या समस्या सोडवता येतील. मीन नात्यात गोडवा वाढेल. कार्यालयात आपली व्यावसायिक क्षमता सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. आर्थिक परिस्थिती आणि आरोग्य चांगले राहिल. त्यामुळे काही मोठे आर्थिक निर्णय घेण्याचा विचार करू शकता.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
