पुण्यात तरुणाचे भररस्त्यात अश्लिल चाळे; लेकाच्या कृत्याची बापाला शिक्षा, प्रकरणात मोठी अपडेट

पुण्यात BMW कारमधील एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात तरुणाचे भररस्त्यात अश्लिल चाळे; लेकाच्या कृत्याची बापाला शिक्षा, प्रकरणात मोठी अपडेट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 4:48 PM

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकारानंतर शहरात संतापाची लाट आहे. ऐन महिला दिनाच्या दिवशीच ही घटना घडली आहे. पुण्यात आज सकाळच्या सुमारास बीएमडब्लूमध्ये असलेल्या एका मद्यधुंद तरुणानं भरस्त्यात येणाऱ्या -जाणाऱ्या महिलांच्या समोर अश्लिल चाळे केले आहेत.  या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणात आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तर मनोज आहुजा असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या वडिलांचं नाव आहे.

दरम्यान या घटनेवर बोलताना गौरव आहुजा याच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.  ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटलं की,  आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लघुशंका करताना आणि असभ्य वर्तन करताना तरुण आढळून आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. सगळ्या संशयित ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे.  प्रसार माध्यमातून ही घटना बाहेर आली. अद्याप आरोपीचं जुनं रेकॉर्ड चेक करण्यात आलेलं नाहीये. घटना घडली तेव्हा गाडीत दोघेजण होते. दोघांनाही ताब्यात घेतलं जाईल. चालक आणि सोबत असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. घटना घडली तेव्हा तरुणांनी मद्यप्राशान केलं होतं की नाही? याचा देखील तपास सुरू आहे.  तरुणांची ओळख पटली असून त्याचा शोध घेण्यासाठी टीम रवाना झाल्या आहेत.