AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भररस्त्यात तरुणाचे अश्लील चाळे, वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले ‘त्याने लघुशंका सिग्नलवर नाही तर माझ्या…’

पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. आता या प्रकरणात त्याच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यात भररस्त्यात तरुणाचे अश्लील चाळे, वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले 'त्याने लघुशंका  सिग्नलवर नाही तर माझ्या...'
| Updated on: Mar 08, 2025 | 3:12 PM
Share

पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज देशभरात सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बालात्कार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांन येरवडा परिसरात रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोरच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोर या तरुणानं अश्लिल चाळे केले, त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर आता त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?