
लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. बीडच्या गेवराई तालुक्यात गोविंद बर्गे हे राहण्यास होते आणि त्यांचा प्लॉटिंगच्या व्यवसाय देखील होता. अत्यंत कमी वयात राजकारणातसोबतच व्यवसायात त्यांनी नाव कमावले. गोविंद यांना कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि याच सवयीने घात केला. गोविंद हा सुरूवातीला थापडीतांडा येथील कला केंद्रात जात होता. तिथेच त्याची ओळख पूजा गायकवाड या 21 वर्षीय नर्तकीसोबत झाली. ही ओळख इतकी वाढली की, गोविंदने तिला सोन्याच्या दागिन्यांसोबतच थेट महागडा आयफोन देखील गिफ्ट केला. गोविंद हा पूजाच्या घरी कायमच जात. गोविंदला नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशिवाय काहीच दिसत होते. पूजासाठी तो प्रत्येक गोष्ट करत होता.
गोविंदचे वाढलेले प्रेम पाहून पूजाच्या अपेक्षा देखील वाढल्या. फक्त आयफोन आणि दागिन्यांवर तिचे समाधान झाले नाही तर तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करून दे म्हणत त्याच्या मागे तगादा लावण्यास सुरूवात केली. फक्त हेच नाही तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही गोविंदला बार्शी परिसरात शेत जमीन खरेदी करून दे म्हणत होती. गोविंदचा प्लॉटिंगचा व्यवसाय असल्याने तिला जमीन पाहिजे होती.
बार्शी परिसरात किमान पाच एकर जमीन खरेदी करून दे नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते, अशी थेट धमकी गोविंदला पूजा हिने दिली. गोविंद आपल्याला बंगला आणि जमीन खरेदी करून देत नसल्याने पूजाचा संताप उठवा. तिने रागाच्या भरात थेट गोविंदला बोलणे देखील बंद केले. पूजा बोलत नसल्याने गोविंद तणावात होता. पूजाने आपल्याला बोलावे याकरिता तो सतत प्रयत्न करत होता.
यामधूनच तो थेट तिच्या सासुरे गावातील घरी पोहोचला. यावेळी पूजा देखील घरीच होती. मात्र, पूजाला बोलूनही काहीच मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्याने गोविंद हा पूजाच्या घरातून बाहेर पडला. यानंतर गोविंद हा आपल्या चारचाकी गाडीत बसला. मात्र, तो प्रचंड तणावात होता. यादरम्यान गोविंदने स्वत:वर गोळी झाडली. आता गोविंदच्या कुटुंबियांनी अत्यंत गंभीर आरोप ही केली आहेत.