
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात ( Pooja Chavan Suicide Case ) चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड ( Forest Minister Sanjay Rathod )अजूनही नॉट रिचेबल आहेत. पूजा चव्हाण आत्महत्येला आठवडा उलटून गेला आहे, मात्र भाजपने ( BJP ) थेट नाव घेऊन, आरोपी असा उल्लेख केलेले संजय राठोड यांनी अद्याप दर्शन दिलेलं नाही. त्यातच प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ( CM Uddhav Thackeray) सांगतलंय, मात्र प्रकरणात ज्यांचं नाव घेतलं जातं आहे, त्या संजय राठोड यांचा अद्याप काहीही ठाव ठिकाणा नाही. त्याचा फोन नॉट रिचेबल आहे. शिवाय, प्रकरण समोर आल्यापासून ते कुठेही दिसलेले नाहीत. त्यातच आता बंजारा समाजानेही ( Banjara community ) संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे संजय राठोड कधी समोर येणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे. ( Pooja Chavan Suicide Case update where is Maharashtra minister sanjay rathod shiv sena leader )
बंजारा समाजाकडून राठोडांना पाठिंबा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव गोवलं जात आहे. यामुळे बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरु आहे. ही बदनामी थांबवावी अशी भूमिका बंजारा धर्मगुरू आणि महंतांनी मांडली. पोहरादेवी इथं सेवालाल जयंती उत्सव सुरु आहे. या उत्सवादरम्यान समाजाच्या संत महंतांनी राठोड यांना पाठिंबा दिला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पूजाच्या वडिलांना प्रतिक्रिया दिली आहे. या आत्महत्येत कुणाचाही सहभाग नाही. कर्जाच्या ओझ्यामुळं तिने हे पाऊल उचललेलं असू शकतं असं पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे. याच वक्तव्याचा आधार घेत, बंजारा समाजाकडूनही आता या प्रकरणावर पडदा टाकण्याची मागणी होत आहे. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत, त्यांची बदनामी बंद करावी असं या महंतांकडून सांगण्यात आलंय
पूजा चव्हाण ही आमच्या समाजाची एक होतकरु तरुणी होती. तिची आत्महत्या दुर्दैवी आहे. मात्र, या आत्महत्येच्या आडून आमच्या समाजाच्या नेत्याची राजकीय कारकिर्द संपवण्याचं कटकारस्थान विरोधकांकडून केलं जात असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या महंतांकडून करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या निमित्ताने मीडिया ट्रायल केली जात आहे, यामुळं बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरु आहे. आम्ही पूजाच्या कुटुंबाच्या दु:खातही सहभागी आहोत आणि संजय राठोडांच्या पाठिशीही ठामपणे उभे आहोत असं या महंतांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढं आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत.
संबंधित बातम्या:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा नोंद नाही: पुणे पोलीस
( Pooja Chavan Suicide Case update where is Maharashtra minister sanjay rathod shiv sena leader )